पन्हाळा गड येथे नारळाच्या झाडावर वीज पडून लागलेली आग
कोल्हापूर
कोल्हापूर: पन्हाळा गडावर वीज पडून नारळाच्या झाडाला आग
पन्हाळा: पुढारी वृत्तसेवा : पन्हाळगडावर आज (दि.२०) दुपारी जोरदार वळीव पावसाने हजेरी लावली. महाजन बोळ येथील परसबागेतील नारळीच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने पेट घेतला. पन्हाळा नगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग तातडीने विझवली. गडावर अनेक दिवस हुलकावणी देत असलेल्या पावसाने आज हजेरी लावली. विजांच्या गडगडाटसह जोरदार पाऊस पडला, आणि वीज देखील पडली. दरम्यान, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
हेही वाचा

