

कौलव, पुढारी वृत्तसेवा : परिते ते भोगावती रस्त्यावर ठिकपुर्ली फाट्यानजीक झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (मंगळवार) दुपारी झाला. अंजना बळीराम किरूळकर (वय-५६, रा. राशिवडे खुर्द, ता. राधानगरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, राशिवडे खुर्द येथील संदीप किरूळकर हा तरुण आपली आई अंजना यांना भोगावती येथील दवाखान्यात दाखवून आपल्या दुचाकीवरून (एम. एच. 0९ एफ एस ३००६) राशिवडे बुद्रुककडे चालला होता. यावेळी फाट्यानजीक कोल्हापूरकडे चाललेल्या डंपरला (एम. एच. ११ ए. एल २३९५) बाजू देऊन पुढे जात असताना अचानक अंजना या गाडीवरून खाली पडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झालेली होती.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : महिला दिनानिमित्त पुढारीच्या वतीने विशेष मुलाखती