Kolhapur news: कळे-गगनबावडा वाहतूक ठप्प; परखंदळे-मेंगाणेवाडीजवळ झाड कोसळले

Kolhapur Gaganbawda highway traffic: कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय मार्गावर परखंदळे-मेंगाणेवाडी (ता.पन्हाळा) येथे रस्त्याकडेचे मोठे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प.
Tree collapse Menghanewadi Kolhapur Gaganbawda highway
Tree collapse Menghanewadi Kolhapur Gaganbawda highwayfile photo
Published on
Updated on

Kolhapur Gaganbawda highway traffic

कळे : रवींद्र पाटील

कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय मार्गावर परखंदळे-मेंगाणेवाडी (ता. पन्हाळा) येथे रस्त्याकडचे मोठे झाड आज (दि. ७) सकाळी पावणेअकराच्या सुमारास कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

कळे-गगनबावडा मार्गावर दोन्ही बाजूंना 'रेन ट्री'ची झाडे आहेत. यांपैकी परखंदळे येथील मेंगाणेवाडी फाट्यावर असलेले मोठे झाड रस्त्यात मधोमध कोसळले. यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी तळकोकणात जाणाऱ्या-येणाऱ्या एसटी बससह इतर वाहने अडकून पडली. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाने धाव घेऊन झाड हटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Tree collapse Menghanewadi Kolhapur Gaganbawda highway
Kolhapur Rain update : नद्यांच्या पाणीपातळीत वाढ सुरूच

५४ बंधारे पाण्याखाली; १८ मार्गांवरही पाणी

जिल्ह्यातील ५४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यासह १८ मार्गांवरील थेट वाहतूक बंद झाली आहे. ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. परिणामी जिल्ह्यातील अडीचशेवर गावांतील दळणवळण विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम दुध वाहतूक, व्यापार, शाळा, व्यवसाय आदींसह शेती कामासाठी दैनंदिन ये-जा करणाऱ्यांवर अधिक झाला आहे.

जिल्ह्यात पाच दिवसांपासून मुसळधार पावसाचे धूमशान सुरू होते. सर्वच नद्यांना पूर आला असून पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. यामुळे २९९ बंधाऱ्यांपैकी ५४ बंधारे सोमवारी सांयकाळी चार वाजेपर्यंत पाण्याखाली गेले होते. यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी सर्व प्रकारची वाहतूक बंदच आहे. परिसरातील गावांची कनेक्टिव्हिटी पूर्णपणे तुटली आहे. परिणामी दुसऱ्या मार्गाने काही अंतराचा फेरा मारून वाहनधारकांची ये-जा सुरू आहे. पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांसह जिल्ह्यातील ३ राज्य, ५ प्रमुख जिल्हा मार्ग, ८ ग्रामीण मार्ग आणि २ इतर जिल्हा मार्ग असे एकूण १८ मार्ग बाधित झाले आहेत. या मार्गावर काही ठिकाणी पाणी असल्याने त्यावरील वाहतूक बंद असून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील प्रमुख १५ नद्यांपैकी १३ नद्यांवरील बंधारे आतापर्यंत पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक दहा बंधारे वेदगंगा नदीवरील आहेत. वेदगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, सुरुपली, गारगोटी, म्हसवे, करडवाडी व शेणगाव या बंधाऱ्यांवर पाणी आहे. पंचगंगा आणि कासारी नदीवरील प्रत्येकी सात बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. पंचगंगेवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ तर कासारी नदीवरील यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपण, बाजार भोगाव, वालोली, कांटे व पेंडाखळे या बंधाऱ्यांचा समावेश आहे. घटप्रभा नदीवरील कानडी-सावर्डे, हिंडगाव, पिंपळी, भोगोली, अडकूर या पाच बंधाऱ्यांवर पाणी आले आहे.

Tree collapse Menghanewadi Kolhapur Gaganbawda highway
Kolhapur Heavy rain : मांगले-सावर्डे बंधाऱ्यालगतचा रस्ता वाहून गेला; शेकडो एकर शेती पाण्याखाली, ग्रामस्थांचा संताप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news