Pune Graduate Constituency Election Voting : 'पदवीधर'ची मतदान प्रक्रिया समजून घ्या

निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली यांची माहिती
  Padvidhar Election Voting Process
Padvidhar Election Voting ProcessPudha
Published on: 
Updated on: 

Pune Padvidhar Election Voting Process

कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकीत मतदान पद्धती आणि आयोगाच्या अन्य सार्वत्रिक निवडणुकांत मतदान पद्धती यात मूलभूत फरक आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावापुढे पसंतीक्रम नोंदवावा लागणार आहे. जितके उमेदवार निवडणूक लढवित असतील अशा सर्वांप्रमाणे पसंतीक्रम नोंदविता येतो. मतदानाच्या या वेगळ्या पद्धतीमुळे मतदारांनी आणि विशेषतः प्रथमच मतदान करणाऱ्यांनी ही पद्धत जाणून योग्यरीतीने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

असे करा मतदान

१. मतदानासाठी मतपत्रिकेबरोबर दिलेल्या जांभळ्या रंगाचे स्केच पेनच वापरावे. अन्य कोणतेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईंट पेन आदी वापरू नये. प्रथम पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर १ असा आकडा लिहावा. १ आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर द्या. तो एकाच वेळी वापरता येईल.

२. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता जेवढे उमेदवार असतील तेवढे पसंतीक्रम देता येतील. उमेदवाराच्या नावासमोर फक्त एकच आकडा घातलेला आहे आणि तोच आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातलेला नाही याची खात्री करा.

३. पसंतीक्रम फक्त १, २, ३ इत्यादी आकड्यांमध्ये लिहावा. एक, दोन, तीन असे शब्दांत लिहू नये. पसंतीक्रमाने आकडे भारतीय अंकांच्या १, २, ३ इत्यादीसारख्या आंतरराष्ट्रीय रुपात किंवा I, II, III इत्यादीसारख्या रोमन रुपात किंवा १, २, ३ अशा देवनागरी रुपात किंवा संविधानाच्या अनुसूची आठमधील मान्यता दिलेल्या कोणत्याही एक भारतीय भाषेमध्ये वापरण्यात येणाऱ्या रुपामध्ये देता येतील.

४. मतपत्रिकेवर मतदाराने आपले नाव, आद्याक्षरे किंवा अन्य शब्द लिहू नयेत किंवा स्वाक्षरी करू नये. तसेच आपल्या अंगठ्याचा ठसा देखील उमटू नये. असे केल्यास मतपत्रिका अवैध ठरेल.

५. पसंतीक्रम सांगण्यासाठी उमेदवाराच्या नावासमोर V किंवा X अशी खूण पुरेशी नाही. पसंतीक्रम फक्त कंसातच द्यावा. एकूण उमेदवारांपैकी एका उमेदवारासमोर १ हा आकडा लिहिणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम ऐच्छिक आहेत.

  Padvidhar Election Voting Process
Pune Graduate Constituency Election: पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी डॉ. स्मिताताई जाधव यांना संधी द्या: वैभव सोलनकर

या मतपत्रिका अवैध ठरतील

१. पसंतीचा १ हा आकडा घातलेला नसल्यास.

२. १ हा आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातलेला असल्यास.

३. १ हा आकडा, तो कोणत्या उमेदवाराला देण्यासाठी घातलेला आहे, याबाबत शंका निर्माण होईल अशाप्रकारे घातलेला असेल.

४. एकाच उमेदवाराच्या नावासमोर १ आणि त्यासोबत २, ३ इत्यादी आकडे घातलेले असल्यास पसंतीक्रम आकड्याऐवजी शब्दांमध्ये दर्शविलेला असेल.

५. मतदाराची ओळख पटू शकेल अशी कोणतीही खूण किंवा लेखन असेल आणि असे आकडे घालण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेन व्यतिरिक्त अन्य साधनाने कोणताही आकडा घातलेला असेल.

'पदवीधर'साठी ओमप्रकाश बकोरिया, 'शिक्षक'साठी रूचेश जयवंशी निवडणूक निरीक्षक

पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून ओमप्रकाश बकोरिया यांची नियुक्ती केली आहे. त्यांचा निवासाचा पत्ता 'सिंहगड', व्हीव्हीआआईपी सर्किट हाऊस, बंडगार्डन पुणे असा असून त्यांचा मोबाईल क्र. ९१८५९०३३९३ असा आहे. निवडणूक निरीक्षक यांना व्हीव्हीआआईपी सर्किट हाऊस येथे सकाळी सकाळी १० ते ११ या कालावधीत भेटता येईल. तसेच मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल. निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी मनोज ठाकरे हे असून त्यांचा संपर्क क्र. ९९६०१९५०६२ असा आहे,

जयवंशी यांचा निवासाचा पत्ता 'शिवनेरी', व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस, बंडगार्डन पुणे असा असून त्यांचा मोबाईल क्र. ८२०५८७७६९ असा आहे. निवडणूक निरीक्षक यांना व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे सकाळी सकाळी ११ ते दुपारी १२ या कालावधीत भेटता येईल. तसेच या क्रमांकावर संपर्क साधता येईल. निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी अनिल बडे हे असून त्यांचा संपर्क क्र. ९२८४०५८४९९ असा आहे.

  Padvidhar Election Voting Process
Pune Graduate Election: पुणे पदवीधर निवडणूक: डॉ. स्मिताताई जाधव यांना बीएसएनएल कर्मचारी आणि आयएमएचा पाठिंबा

एमसीसी समिती कार्यान्वित

१. पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या द्वार्षिक निवडणुकीसाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणिकरण समिती (एमसीसी) कार्यान्वित करण्यात आली आहे. निवडणूक प्रचारासाठी उपयोगत आणले जाणारे बल्क एसएमएस, रॅकॉर्डेड व्हाईस मेसेजेस, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील तसेच प्रकारच्या डिजिटल मीडिया जाहिराती यांना जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीसी) प्रमाणिकरण करून घेणे बंधनकारक आहे, असे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी सांगितले.

२. प्रमाणित करावयाच्या जाहिरातीचा मसुदा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आणि दोन प्रतीत संहितेसह समितीकडे प्रसाणाच्या ३ दिवस अगोदर सादर करावा. उमेदवारांच्या राजकीय जाहिरातींच्या प्रमाणिकरणासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीशी (एमसीसी) संबंधित जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.

  Padvidhar Election Voting Process
Pune Graduate Teacher Constituency Election: पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आज पुण्यात

मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा

पदवीधर व शिक्षक मतदारसंघात संघासाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या दिवशी भरपगारी सुटी जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीत मतदार असणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३५ थ नुसार भरपगारी सुटी जाहीर करण्यात आली आहे. ही रजा त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे. ही विशेष नैमित्तिक रजा खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना लागू होणार नाही. या निवडणुकीकरिता खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पदवीधर, शिक्षक मतदारांना मतदानासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्यात यावी, असे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news