Pune Graduate Constituency Election: पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी डॉ. स्मिताताई जाधव यांना संधी द्या: वैभव सोलनकर

रोजगार, बेरोजगारी आणि युवकांच्या समस्यांसाठी सक्षम नेतृत्वाची गरज; भाजप युवा मोर्चाची गावोगावी प्रचार मोहीम
Dr Smita Jadhav Vaibhav Solankar
Dr Smita Jadhav Vaibhav SolankarPudhari
Published on: 
Updated on: 

बारामती: पुणे पदवीधर मतदारसंघातील पदवीधरांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी डॉ. स्मिताताई जाधव या सक्षम उमेदवार आहेत. पदवीधरांच्या समस्यांवर प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. स्मिताताई जाधव यांना संधी द्यावी, असे आवाहन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी केले आहे.

Dr Smita Jadhav Vaibhav Solankar
Maharashtra Farmer Loan Waiver Scheme: शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांना लाभ

भारतीय जनता पक्षाच्या वतीने गावोगावी प्रचार मोहीम राबविण्यात येत असून, भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते या प्रचारात सक्रियपणे सहभागी झाले आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघाची शैक्षणिक व बौद्धिक परंपरा जपण्याबरोबरच पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. रोजगाराच्या संधी, युवकांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण, शैक्षणिक अडचणी आणि पदवीधरांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे पाठपुरावा करणारे नेतृत्व आज काळाची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Dr Smita Jadhav Vaibhav Solankar
Ghod Dam Farmers Protest: शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित; संतप्त शेतकऱ्यांचा रांजणगाव एमआयडीसीला पाणी रोखण्याचा इशारा

समस्यांची जाण असणारे जाधव कुटुंब

पदवीधरांच्या समस्या, शैक्षणिक अडचणी, बेरोजगारी आणि युवकांच्या प्रश्नांची जाण असणारे जाधव कुटुंब हे समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आहे. पदवीधरांच्या अपेक्षा समजून घेऊन त्यांचे प्रश्न सक्षमपणे मांडण्यासाठी डॉ. स्मिताताई जाधव या सक्षम उमेदवार असल्याचा विश्वास वैभव सोलनकर यांनी व्यक्त केला.

Dr Smita Jadhav Vaibhav Solankar
Maharashtra Sahitya Parishad Dispute: शंभराव्या साहित्य संमेलनाआधीच मसापमध्ये अंतर्गत वाद; सुनील महाजन यांना कारवाईची नोटीस

पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार

पदवीधरांचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच रोजगाराच्या संधी, युवकांच्या भविष्यातील अपेक्षा आणि विविध क्षेत्रांतील अडचणींचा विचार होणे गरजेचे आहे. डॉ. स्मिताताई जाधव यांच्या माध्यमातून पदवीधरांचे प्रश्न योग्य व्यासपीठावर मांडले जातील आणि त्यावर सकारात्मक कार्यवाहीसाठी प्रयत्न होतील, अशी अपेक्षा वैभव सोलनकर यांनी व्यक्त केली.

Dr Smita Jadhav Vaibhav Solankar
Pune Graduate Teacher Constituency Election: पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आज पुण्यात

गावोगावी प्रचार मोहीम

भारतीय जनता पार्टीच्या वतीने गावोगावी प्रचार मोहीम राबविण्यात येत असून, भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधत आहेत. डॉ. स्मिताताई जाधव यांची भूमिका आणि पदवीधरांच्या प्रश्नांबाबतची बांधिलकी मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी युवा मोर्चा सक्रियपणे काम करत आहे. पदवीधर मतदारांनी डॉ. स्मिताताई जाधव यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना संधी द्यावी, असे आवाहन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news