कोल्हापूर : हालोंडी येथे ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी पर्यंत पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव

कोल्हापूर : हालोंडी येथे ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी पर्यंत पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव
Published on
Updated on

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : हालोंडी (ता. हातकणंगले) येथे श्रीमद्ददेवाधिदेव १००८ भगवान श्री पार्श्वनाथ तीर्थकार जिन मंदिर व मानस्तंभोपरी चतुर्मुख जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव द्वादश वर्षपूर्ती निमित्त श्रीमद्ददेवाधिदेव १००८ सहस्त्रनाम आराधना महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. ३१ जानेवारी ते रविवार दि. ४ फेब्रुवारी पर्यंत हा महोत्सव होणार आहे. श्री १००८ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जिन मंदिर कमिटी, श्रीमद्ददेवाधिदेव १००८ सहस्त्रनाम आराधना महामहोत्सव समिती, समस्त दिगंबर जैन समाज, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महामहोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बुधवार दिनांक ३१ रोजी पहाटे पाच वाजता मंगलवाद्य घोष, सव्वापाच वाजता यजमानांच्या घरी मंगल स्नान, नांदी मंगल, आणि मंदिरापर्यंत सवाद्य मिरवणूक होणार आहे. सकाळी सहा वाजता मूलनायक भगवतांचा पंचामृत अभिषेक, महाशांती मंत्र, आचार्य श्री निमंत्रण, प्रतिष्ठाचार्य निमंत्रण संध्यावंदन, इंद्र यजमान प्रतिष्ठा, कंकण बंधन, व्रत बंधन, ध्वजारोहण, मंडप उद‌घाटन, मंडप प्रतिष्ठा, कलश स्थापना दातारांची हत्तीवरून मिरवणूक आणि सहस्त्रनाम विधानास प्रारंभ होणार आहे. या महोत्सव कालावधीमध्ये सकाळी ६ पासून रात्री १० वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दररोज सकाळी दहा वाजता आणि सायंकाळी पाच वाजता हत्तीवरून सवाद्य मिरवणूक होणार आहे. एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी हेलिकॉप्टर आणि अन्य सवाल होणार आहेत. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता गर्भसंस्कार विधी होणार आहे. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता मौजी बंधन उपनयन संस्कार विधी होणार आहे. दुपारी चार वाजता राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. तर सायंकाळी सात वाजता रथोत्सवाचा सवाल होईल. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ४ या कालावधीत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार आहे. दररोज दुपारी चार वाजता आचार्यश्रींचे प्रवचन होणार आहे.

हा महामहोत्सव परमपूज्‍य गणाधिपती गणधराचार्य श्री १०८ कुंथुसागर महाराज, परमपूज्य प्रज्ञा योगी दिगंबर जैनाचार्य गुप्तिनंदी महाराज यांच्या आशीर्वादाने परमपूज्य आचार्य श्री सुयश गुप्तजी महाराज सहसंघ पावन सानिध्यात आणि जगद्‌गुरु जगतपूज्य अभिनव स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी महासंस्थान मठ कोल्हापूर यांच्या अधिनेतृत्वाखाली होत आहे. जगद्‌गुरु जगत पूज्य स्वस्ति श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थांमठ नांदणी, परमपूज्य मुनी श्री श्रमनंदीजी महाराज, परमपूज्य मुनीश्री तत्वार्थनंदी महाराज, परमपूज्य क्षल्लक श्री जिनदत्त सागर महाराज यांच्या पावन उपस्थितीत होत आहे. दररोज जलकुंभ मिरवणूक, पंचामृत अभिषेक, अन्नदातारांची हत्तीवरून मिरवणूक, सहस्त्रनाम विधान, हत्तीवरून जिनशास्त्र आणि धर्म ध्वज मिरवणूक धनपती कुबेरा द्वारे समवशरणावरती रत्नवृष्टी, असे अनेक विविध धार्मिक विधी प्रतिष्ठाचार्य संजीव जंबू उपाध्ये, प्रतिष्ठाचार्य प्रशांत आदिनाय उपाध्ये, स्थानिक पंडित अनिल श्रीपाल उपाध्ये, प्रमोद दीपक उपाध्ये यांच्यासह अन्यविधानाचार्यांच्याकडून होणार आहेत. या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी सुनील पाटील, जे.बी. पाटील, प्रदीप पाटील, बाबासो घुमाई, माणिक घुमाई, अशोक पाटील, अमोल पाटील, तात्यासो पाटील, महावीर पाटील, गुंडा पाटील, राजेंद्र पाटील, धन्यकुमार मंडपे, कुलभूषण पाटील, जितेंद्र पाटील, काकासो पाटील, उद्योगपती किरण पाटील, रणजीत शेट्टे, विशाल पाटील, शरद पाटील, संजय उपाध्ये, महावीर सोनुरे, अमोल पाटील, हर्षल पाटील हे उपस्थित होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news