चिंचली मायाक्का देवीची यात्रा २४ फेब्रुवारी ते ३ मार्चअखेर | पुढारी

चिंचली मायाक्का देवीची यात्रा २४ फेब्रुवारी ते ३ मार्चअखेर

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचली (ता. रायबाग, जि. बेळगाव) येथील श्री मायाक्का (माकुबाई) देवीची यात्रा (शनिवार दि. 24 फेब्रुवारी ते रविवार दि. 3 मार्च) अखेर होणार असल्याची माहिती श्री मायाक्का देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

या यात्रेत सुमारे 4 ते 5 लाख भाविक उपस्थित राहणार असल्याने कुडची, रायबाग पोलिस व देवस्थान समितीने यात्रेसाठी नियोजन सुरू केले आहे. बुधवार दि.28 फेब्रुवारी रोजी महानैवेद्य बोनी व पालखी सोहळा होणार आहे. यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात स्टॉल असतात. भंडारा व खोबरे यांची हजारो टनाची उधळण होत असते. ही यात्रा रविवार (दि.3) मार्चअखेर भरणार आहे. सौंदत्ती श्री रेणुकादेवी यात्रेला गेलेले सर्व भाविक या यात्रेत सहभागी होतात.

Back to top button