Gokul Election 2026 | 'गोकुळ'मधील जागावाटपाचा तिढा कायम! भाजप २५ जागा लढवण्यासाठी सज्ज: आमदार अमल महाडिकांची स्पष्टोक्ती

२१ सप्टेंबर रोजी सर्वच २५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार
Pudhari
GokulPudhari
Published on
Updated on

Gokul Election 2026 : राज्याच्या सहकार क्षेत्रातील बहुचर्चित 'गोकुळ' दूध संघ निवडणुकीतील जागावाटपाचा तिढा कायम राहिला आहे. महायुती म्हणून आम्ही एकत्र जाण्यासाठी तयार आहोत, मात्र सध्या तरी २१ सप्टेंबर रोजी सर्वच २५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत, असे आज (दि. १९ सप्टेंबर) भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी स्पष्ट केले.

अद्याप जागावाटपासंदर्भातील कोणताही निर्णय नाही

अद्याप जागावाटपासंदर्भातील कोणताही निर्णय झालेला नाही. गोकुळ निवडणुकीसाठी सर्व २५ जागांवर भाजपचे उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. यानंतर भाजप पक्षनेतृत्वांसमोर हा विषय मांडला जाईल. त्यानंतर ते याबाबत निर्णय घेतील, असेही अमल महाडिक यांनी सांगितले.

Pudhari
Gokul Election : मंत्री मुश्रीफ, आ. कोरे मुख्यमंत्र्यांच्‍या भेटीला!

महायुतीकडे १०, समविचारींकडे १९ जणांना संधी

गोकुळ निवडणुकीत महायुती व काँग्रेसकडे सध्या मागील संचालक मंडळातील बहुतांश जणांना पुन्हा संधी मिळेल, अशी शक्यता आहे. महायुतीकडे सध्या १५ माजी संचालक आहेत. त्यामुळे येथे १० जणांना, तर काँग्रेसकडे सहा माजी संचालक असल्याने येथे तब्बल १९ नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. महायुतीमधील शिल्लक जागांमध्येही अनेक जागांवर नेते व त्यांचे वारसदार यांनाच संधी मिळेल, असे चित्र आहे.

Pudhari
Gokul Election 2026 | ‘गोकुळ’च्या ४९२ दूध संस्थांना ‘सर्वोच्च’ दिलासा

'या' विद्यमान-माजी संचालकांचे अर्ज दाखल

  • राष्ट्रवादी: नवीद मुश्रीफ, अरुण डोंगळे, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, युवराज पाटील, वसंत ऊर्फ बाळासो खाडे.

  • शिवसेना (शिंदे गट) : विश्वास पाटील, अजित नरके, एस. आर. पाटील, डॉ. सुजित मिणचेकर.

  • जनसुराज्य: अमरसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड.

  • काँग्रेस: बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, बयाजी शेळके, अभिजित तायशेटे, प्रकाश पाटील, अंजना रेडेकर.

Pudhari
Gokul Election | ‘गोकुळ’मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ : मंत्री मुश्रीफ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news