Gokul Election | ‘गोकुळ’मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ : मंत्री मुश्रीफ

Gokul Election |
Gokul Election | ‘गोकुळ’मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ : मंत्री मुश्रीफ
Published on
Updated on

कोल्हापूर : महायुतीत राज्यात भाजप मोठा भाऊ आहे. मात्र, ‘गोकुळ’मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मोठा भाऊ असल्याचा पुनरुच्चार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. कोल्हापूर विमानतळावर शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाईल. जागा वाटपाचा तिढा सुटेल, त्यात मुख्यमंत्री मार्ग काढतील, असेही त्यांनी सांगितले.

अपात्र होता होता वाचलेल्या १४०० संस्था सभासदांनी ‘अदृश्य शक्तीं’सोबत जाणार नाही, असा इशारा दिला, त्याबाबत विचारता मुश्रीफ म्हणाले, याबाबत मला अद्याप काही माहीत नाही. चर्चेतून मार्ग निघेल. आम्ही ‘महायुती’ म्हणूनच लढणार आहोत. बहुतांशी सदस्य महायुतीचेच असताना पात्र-‍अपात्रतेबाबत असे का होत आले आहे? हे आजही मला अनाकलनीयच आहे. आजही मला तरी याचे उत्तर सापडलेले नाही. पण यातून सामंजस्याने मार्ग काढला जाईल.

गोकुळच्या जागा वाटपाचा तिढा कसा सोडवणार? याबाबत ते म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांना आम्ही सर्व सांगितलेले आहे. तिढा व्यवस्थित सुटेल, तेच यातून मार्ग काढतील. महायुतीत पालकत्वाची भूमिका मुश्रीफ यांनीच घेतलेली आहे, बाकीच्यांनी ती सोडून दिलेली आहे, असे समजायचे का? या प्रश्नावर ते म्हणाले, इतर सगळे म्हणतायेत की हसन मुश्रीफ बोलत आहेत, तर पुन्हा आपण कशाला बोला.

आरोप करणाऱ्यांनीच अदृश्‍य शक्‍तीचा खुलासा करावा : अमल महाडिक

कोल्‍हापूर : गोकुळमधील अदृश्‍य शक्‍तीबाबत ज्‍यांनी आरोप केला त्‍यांनीच अदृश्‍य शक्‍तीबाबत खुलासा करावा, असे आवाहन आमदार अमल महाडिक यांनी प्रसारमाध्‍यमांशी बोलताना केले. तसेच गोकुळ निवडणुकीत महायुती म्‍हणूनच एकत्र राहणार असल्याचेही त्यांनी स्‍पष्‍ट केले.

गोकुळ निवडणुकीत अदृश्‍य शक्‍तीला सोबत घेतले तर आम्‍ही तुमच्‍यासोबत नाही, असा इशारा १४०० दूध संस्‍थांनी गुरुवारी मेळावा घेत राष्‍ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्‍यच्‍या नेत्‍यांना दिला होता. याचा संदर्भ घेत अदृश्‍य शक्‍ती कोण याबाबत आमदार महाडिक यांना विचारले असता त्‍यांनी, ज्‍यांनी आरोप केला त्‍यांनीच खुलासा करावा, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच गोकुळची निवडणूक कशा पध्‍दतीने लढवायची हे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील. महायुतीमधील वरिष्‍ठ नेत्‍यांच्‍या सूचनेनुसारच निवडणूक लढवली जाईल. महायुती म्‍हणून आम्‍ही एकत्रच असणार असल्‍याचे आ. महाडिक यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news