Gokul Hearing | गोकुळ शासन नियुक्त संचालक निर्णयाविरोधात पुढील सुनावणी ३ डिसेंबरला; आजच्या सुनावणीत काय घडलं?

शासन नियुक्त चार संचालकांनाही पुढील तारखेची नोटीस काढण्याची सूचना
Gokul Chairman Election
Gokul Chairman ElectionPudhari news
Published on: 
Updated on: 

Gokul Dairy Chairman Hearing : गोकुळ दूध संघाची अध्यक्षपदाची निवडणूक आणि शासन नियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकाराशी संबंधित प्रकरणाची सुनावणी आज (दि. २५ नोव्हेंबर) मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झाली.आजच्या सुनावणीवेळी शासन नियुक्त चार संचालकांनाही पुढील तारखेची नोटीस काढण्याची सूचना न्यायालयाने केली. आता या प्रकरणी पुढील सुनावणी ३ डिसेंबरला होणार आहे.

समविचारी आघाडीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी

राज्य सरकारने सहकार कायद्यात सुधारणा करत चार अशासकीय संचालकांची नियुक्ती करून त्यांना मताचा अधिकार दिल्याने समविचारी आघाडीने कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. समविचारी आघाडीने दाखल केलेल्या दोन याचिकांवर आज न्यायालयात दुरुस्ती अर्ज सादर करण्यात आला. अध्यक्ष निवडीसाठी दहा तारखेला झालेल्या अध्यक्ष निवड बैठकीतील घटना रेकॉर्डवर आणायच्या होत्या. तसेच, ज्या संचालकांना अद्याप नोटीस दिलेली नाही, अशा संचालकांना नोटीस देण्यासाठी विनंती केली. कोर्टाने ही विनंती मंजूर केली.

Gokul Chairman Election
Consumer Commission Online Hearing: ग्राहक आयोगाच्या सुनावण्या आता ऑनलाइन; राज्यातील सर्व आयोगांना सुविधा बंधनकारक

न्यायालयात दुरुस्ती अर्ज सादर

समविचारी आघाडीने दाखल केलेल्या दोन याचिकांवर आज न्यायालयात दुरुस्ती अर्ज सादर करण्यात आला. अध्यक्ष निवडीसाठी दहा तारखेला झालेल्या अध्यक्ष निवड बैठकीतील घटना रेकॉर्डवर आणायच्या होत्या. तसेच, ज्या संचालकांना अद्याप नोटीस दिलेली नाही, अशा संचालकांना नोटीस देण्यासाठी विनंती करण्यात आली. न्यायालयाने ही विनंती मंजूर केली आहे, अशी माहिती समविचारी आघाडीचे वकील गणबावले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Gokul Chairman Election
Gokul Hearing | ‘गोकुळ’च्‍या सुनावणीकडे लक्ष अन् सर्वसाधारण सभेची लगबग

राज्य सरकारकडून शासन नियुक्त संचालक नेमण्‍याचा निर्णय

गोकुळच्या निवडणुकीत महायुतीच्या आघाडीला १२, तर राजर्षी शाहू समविचारी आघाडीला १३ जागा मिळाल्या. समविचारी आघाडीला बहुमत मिळूनही अध्यक्ष निवडीच्या सभेला महायुतीचे संचालक अनुपस्थित राहिले. कोरमसाठी आवश्यक असलेले १४ संचालकांचे संख्याबळ पूर्ण न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी सभा तहकूब केली होती. या निर्णयाविरोधात समविचारी आघाडीने कोल्हापूर उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने सर्व संचालकांना नोटीस बजावत अध्यक्ष निवड सभेला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. यानंतर महायुती सरकारने राज्यातील पाचशे कोटींपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांमध्ये पाच शासन नियुक्त सदस्य नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता.

Gokul Chairman Election
Gokul Milk Price Hike | ७० कोटींची तूट भरून काढण्‍यासाठी ‘गोकुळ’कडून दूध दरवाढीचा निर्णय?

शासन नियुक्त संचालकांविरोधात समविचारी आघाडीची याचिका

गोकुळ अध्यक्ष निवडीवेळी शासन नियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार देणाऱ्या निर्णयाला समविचारी आघाडीने विरोध केला होता. मात्र, न्यायालयाने सरकारच्या अध्यादेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार देत शासन नियुक्त संचालकांची मते स्वतंत्र घेण्याचे निर्देश दिले होते. तसेच, अध्यक्ष निवडीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आणि निकाल याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन ठेवला होता. या चार मतांच्या पाठबळावर महायुतीचे राजेश पाटील अध्यक्षपदी निवडून आले. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष वेधले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.