Gokul Milk Union Kolhapur | गोकुळच्या मावळत्या संचालकांना दिलासा! 'त्या' 427 संस्थापैकी 270 संस्था पात्र

गुरुवारी सकाळी ठरावाची पत्रे रवाना झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे
Gokul Milk Union
Gokul Milk Union Pudhari
Published on
Updated on

आशिष ल. पाटील

गुडाळ : गोकुळच्या पोटनियमाचे उल्लंघन करून सभासद झाल्याचा ठपका असलेल्या 427 प्राथमिक दुध संस्थांपैकी 270 संस्थांना अखेर आज गुरुवारी ठरावाचा मसुदा पाठविण्याचा निर्णय प्राधिकृत अधिकारी कृष्णा ठाकरे यांनी घेतला. दरम्यान, या 427 पैकी उर्वरित 157 दूधसंस्थांचा अवसायनातील 1320 च्या यादीतही समावेश असल्याने त्या सुनावणीच्या निर्णयावर उर्वरित संस्थांच्या सभासदत्वाचे भवितव्य अवलंबून आहे.

Gokul Milk Union
Gokul Dudh Sangh Election : ‘गोकुळ’च्या अपात्र ठरलेल्या ४२७ संस्थांना मोठा धक्का; ३९३६ संस्थांना ठरावाचे नमुने जारी

427 संस्थाबाबतच्या निर्णयामुळे गोकुळ च्या मावळत्या संचालक मंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे. ठरवाचा मसुदा पाठविण्याच्या अंतिम दिवशी 1 जून रोजी श्री. ठाकरे यांनी गोकुळ च्या कार्यकारी संचालक आणि प्रशासक मंडळाला एक पत्र पाठवून या वादग्रस्त 427 संस्थाबाबत अभिप्राय मागितला होता. मात्र ही बाब आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे त्यांनी कळविले होते. त्यामुळे श्री. ठाकरे यांनी या 427 संस्थांना विभागीय उपनिबंधकांच्या निर्देशाप्रमाणे मसुदा न पाठविण्याचा निर्णय घेतला होता.

Gokul Milk Union
Gokul Dairy | गोकुळ : ‘त्या’ 1,490 दूध संस्थांचे ठराव सशर्त घेणार

श्री. ठाकरे यांच्या या निर्णया विरोधात आ. सतेज पाटील आणि माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये याचिका दाखल करण्याची तय्यारी सुरु केली होती. दरम्यान च्या काळात ना. हसन मुश्रीफ यांनी या 427 संस्थांना पात्र ठरवून ठरावाचा मसुदा पाठविण्यासाठी मुंबईतून राजकीय सूत्रे फिरवत हालचाली सुरु केल्या होत्या. ना. मुश्रीफ यांनी राजकीय जोर लावल्याने अखेर हा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता पर्यंत ठरावाची पत्रे पाठविलेल्या संस्थांची संख्या 4206 झाली असून अद्याप अवसायनातून वगळलेल्या काही संस्थांचा या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news