गडहिंग्लज : ‘गोडसाखर’ कारखान्यावर पुन्हा प्रशासक

गडहिंग्लज : 'गोडसाखर' कारखान्यावर पुन्हा प्रशासकwww.pudhari.newsw
गडहिंग्लज : 'गोडसाखर' कारखान्यावर पुन्हा प्रशासकwww.pudhari.newsw
Published on
Updated on

गडहिंग्लज, पुढारी वृत्तसेवा : गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यावर (गोडसाखर) (Godsugar) प्रशासक नियुक्ती कायम करण्यात आली आहे. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी प्रशासक नियुक्ती व दुपारी स्थगिती, अशी स्थिती गोडसाखरवर घडली होती. याबाबत विरोधी माजी संचालकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेत कारखान्यावर प्रशासक नियुक्ती कायम करावी, अशी मागणी केली होती. यामध्ये दोन वेळा सुनावणी झाली. अखेर उच्च न्यायालयाने प्रशासक नियुक्तीला दिलेली स्थगिती उठवली असून आता पुन्हा गोडसाखरचा कारभार प्रशासकांच्या हाती गेला आहे.

४ फेब्रुवारी रोजी प्रादेशिक साखर सहसंचालक ए. व्ही. गाडे यांनी तीन जणाांचे प्रशासक मंडळ नियुक्त केले होते. यामध्ये सहकारी संस्थांचे उपविभागीय उपनिबंधक अरूण काकडे यांना प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी तर जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे व जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरणसिंह पाटील यांची नियुक्त केली होती. ४ तारखेला त्यांनी कारखाना (Godsugar) कार्यस्थळावर जाऊन प्रत्यक्ष कामकाजाचा ताबा घेतला होता. मात्र, त्यापूर्वी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याचा निकाल दुपारी तीनच्या सुमारास लागला. यामध्ये प्रशासक नियुक्तीला स्थगिती दिल्याने केवळ तीन तासापुरता प्रशासकांचा कारभार झाला होता.

यानंतर पुन्हा राजीनामा दिलेल्या बारा संचालकांनी कारखान्यावर प्रशासक नियुक्तीवरील स्थगिती उठवावी, यासाठी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. याबाबत दोन वेळा सुनावणी झाली. अखेर २३ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाने गोडसाखरच्या (Godsugar) प्रशासक नियुक्तीला दिलेली स्थगिती उठवत गोडसाखरचा कारभार प्रशासकांच्या हाती दिला आहे. गोडसाखरबाबत चाललेल्या हरकती सहकारमंत्र्यांच्या समोर चालविण्याचे आदेशही दिले आहेत.

हेही वाचलतं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news