Sugarcane Price Protest | किणी टोल नाक्यावर शेतकऱ्यांचा चक्काजाम; पुणे-बेंगळूरू महामार्ग रोखला

उसाला प्रतिटन ४,५०० रुपये पहिली उचल देण्याची मागणी; राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात, वाहतूक अन्य मार्गाने वळवली
Swabhimani Shetkari Sanghatana Sugarcane Agitation
Pudhari
Published on: 
Updated on: 

Swabhimani Shetkari Sanghatana Sugarcane Agitation

पेठवडगाव : उसाला पहिली उचल प्रतिटन ४ हजार ५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी पुणे-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन सुरू केले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मांडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून छावणी आंदोलन सुरू आहे. उसाच्या पहिल्या उचलीवरून प्रशासन आणि साखर कारखानदारांसोबत चर्चेच्या दोन फेऱ्या पार पडल्या. मात्र, त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संघटनेने आक्रमक पवित्रा घेत चक्काजाम आंदोलनाचा निर्णय घेतला.

Swabhimani Shetkari Sanghatana Sugarcane Agitation
Sugarcane Price Protest | ऊसदरासाठी स्वाभिमानीचे छावणी आंदोलन

आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनेने व्यापक तयारी केली होती. परिसरातील गावागावांत रॅली काढून शेतकरी आणि नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास राजू शेट्टी यांनी किणी येथील ग्रामदैवत श्री मारुती मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर ते आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महामार्गावर उतरून वाहतूक रोखली.

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. परिसरात तीनशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहने फाटा मार्गे, तर पुण्याकडून येणारी वाहने वाघवाडी फाटा मार्गे वळविण्यात आली आहेत. त्यामुळे किणी टोल नाका परिसरातील महामार्गावर वाहनांची वर्दळ थांबली आहे.

Swabhimani Shetkari Sanghatana Sugarcane Agitation
Sugarcane price protest: ऊसदरासाठी पंढरपुरात ट्रॅक्टरचे टायर फोडले

उसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यक्त केला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे आता साखर कारखानदार आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.