खामकरवाडी लघू पाटबंधारे प्रकल्प भरल्याने शेतकरी सुखावला

खामकरवाडी लघू पाटबंधारे प्रकल्प भरल्याने शेतकरी सुखावला

धामोड : पुढारी वृत्तसेवा : खामकरवाडी (ता. राधानगरी) येथील लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. राधानगरी तालुक्यातील हा पहिलाच प्रकल्प भरला आहे. दरवर्षी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भरणारा हा प्रकल्प अद्याप भरला नव्हता. त्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्ग चिंतातूर झाला होता.

दरम्यान, रविवारी मध्यरात्रीपासून या परिसरात पावसाचा जोर वाढला असून गेल्या चोवीस तासात १४० मीमी पावसाची नोंद झाली आहे. खामकरवाडी येथील लघू पाटबंधारे प्रकल्पाची साठवण क्षमता ६१० दशलक्ष घनमीटर असून या प्रकल्पामुळे खामकरवाडी अवचितवाडी व कुरणेवाडी येथील ११५ हेक्टर जमीन ओलीताखाली आली आहे . हा प्रकल्प भरल्यामुळे खामकरवाडी व अवचितवाडी या गावांचा पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news