KMC Election Result Controversy: कोल्हापुरात बोंद्रे - खराडे गटात राडा... निवडणूक निकाल लागल्यानंतर एकमेकांवर दगडफेक

KMC Election Result Controversy
KMC Election Result ControversyPudhari photo
Published on
Updated on

KMC Election Result Controversy Bondre and Kharade groups Fight: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवाजी पेठेतील बोंद्रे आणि खराडे गटात राडा झाला आहे. महापालिका निवडणूक लागल्यानंतर हा राडा सुरू झाला. दोन्ही कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दरडफेक करण्यात आली. खराडे आणि बोंद्रे दोन्ही कुटुंबातील उमेदवार या निवडणुकीत रिंगणात होते. हे दोन्ही कुटुंबीय एकमेकांचे नातेवाईक देखील आहेत.

KMC Election Result Controversy
Kolhapur Breaking | मनपा निकालानंतर कनाननगर परिसरात तुफान दगडफेक

कोल्हापूर महानगरपालिका पालिका प्रभाग क्रमांक ८ मध्ये काँग्रेसचे इंद्रजीत बोंद्रे आणि शिवसेना शिंदे गटाचे शिवतेज खराडे हे रिंगणात होते. इंद्रजीत बोंद्रे यांनी अटीतटीच्या लढतीत शिवतेज खराडे यांचा फक्त ४०० मतांनी पराभव केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीनंतर राडा झाला आहे.

अशाच प्रकारची घटना कनाननगर इथं देखील घडली होती. तिथं देखील दोन उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडेबाजी झाली होती.

KMC Election Result Controversy
Dhananjay Mahadik KMC Election Result: कधीकाळी भाजपचा एक नगरसेवक... पुरोगामी कोल्हापूर... महायुतीच्या विजयानंतर महाडिक काय म्हणाले?

प्रभाग क्रमांक चार मधील उमेदवार दिलीप पवार आणि मयूर पवार गटात तुफान दगडफेक झाली असून निवडणुकीचा निकाल जाहीर होताच दोन्ही समर्थकांमध्ये झाली दगडफेक सुरु झाली. यावेळी पोलिस समोर असूनही एकमेकांवर दगडफेक सुरु होती. पोलिसांनी बळाचा वापर करुन दोन्ही गटांना बाजूला पांगवले.

KMC Election Result Controversy
BMC Election 2026 Result Live Update: मुंबई महानगरपालिकेत भाजप- सेनेचा दणदणीत विजय; ठाकरेंना किती जागा मिळाल्या?

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलायचं झालं तर यंदाच्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस ३७ जागांवर विजय मिळवून मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला. मात्र त्यांच्या हातात महापालिकेच्या सत्तेची चावी काही आली नाही.

दुसरीकडं महायुतीने एकत्रित मिळून बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यांनी ४१ ही मॅजिक फिगर गाठली आहे. भाजपने २७ जागांवर यश मिळवलं आहे तर शिंदे गटाने १५ जागा जिंकल्या आहेत.

यंदाच्या निडवणुकीत शारंगधर देशमुख आणि ऋतुराज क्षीरसागर यांच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या दोघांनीही आपापला गड राखला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news