

Dhananjay Mahadik KMC Election Result: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने चांगले यश मिळवत सत्ता काबीज केली आहे. महायुतीच्या विजयी उमेदवारांची संख्या जवळपास ४५ पर्यंत पोहचली असून या विजयानंतर महायुतीचे नेते आणि खासदार धनंजय महाडिक यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी जे दिल्लीत तेच गल्लीत हे आज सिद्ध झालं. १५ जानेवारी काँग्रेस कायमची घरी हे सुद्धा सिद्ध झाल्याचं वक्तव्य केलं.
धनंजय महाडिक यांनी महायुतीला पसंती दिल्याबद्दल नागरिकांचे महायुतीतर्फे अभिनंदन करतो असे वक्तव्य केलं. यानंतर महाडिकांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांचे देखील आभार मानले. ते म्हणाले, 'महायुतीचे विचार जनसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी गेली पंधरा दिवस राबलेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नेते यांचं आभार मानतो.'
'कोल्हापूरचा विकास करायचा असेल तर महायुती हाच सक्षम पर्याय आहे, या सर्व यशामध्ये सन्माननीय मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रश्न सोडवू शकतो असा विश्वास दिला. यामुळेच अभूतपूर्व असे यश कोल्हापूर महापालिकेत मिळालं, महायुती महापालिकेत सत्ता स्थापन करू शकते एवढी संख्या आता घोषित झाली आहे.'
लवकरच महायुतीचा महापौर कोल्हापूर महापालिकेत पाहायला मिळेल, काल 15 जानेवारी वाढदिवस साजरा करणार नाही असं सांगितलं होतं, आज महायुतीच्या विजयानंतर भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबत भाजप कार्यालयात वाढदिवस साजरा करत आहे. असेही धनंजय महाडिक म्हणाले.
कोल्हापुरात आज इतिहास घडला आहे कधीकाळी भाजपचा एकच नगरसेवक या शहरात निवडून यायचा, आज आम्ही महायुतीची सत्ता स्थापन करतो याचा विशेष आनंद आहे. काँग्रेसने लढवलेल्या जागांचा स्ट्राईक रेट पाहिला पाहिजे, जागा जास्त लढवल्यामुळे ते 50 टक्क्यांवर आले आहेत, भाजपने 36 जागा लढवल्या त्यातील सर्वात जास्त स्ट्राईकरेतन जागा जिंकल्या आहेत. आम्ही चांगले उमेदवार दिले याचा फायदा झाला. असेही महाडिक म्हणाले.
कायम कोल्हापूरला पुरोगामी शहर म्हणून संबोधले जायचं, मात्र या निवडणुकीत कोल्हापूरकरांनी महायुतीला साथ दिली आहे. कधीच काँग्रेसला सोडून हे शहर मतदान करणार नाही अशी वल्गना करणाऱ्या माजी पालकमंत्र्यांना मोठी चपराक बसली आहे. काल सुद्धा काँग्रेसचे नेते म्हणत होते आम्ही सत्ता स्थापन करणार आहोत मात्र त्यांचं पानिपत झालं आहे.
इचलकरंजीत भाजप नव्हती तेंव्हाही नगराध्यक्ष झाले होते, मात्र आता मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या माध्यमातून महायुती केली होती. मी या नेत्यांना शब्द दिला होता कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा महापौर होणार आणि तो आता होतोय याचा मनस्वी आंनद.