Kolhapur Breaking | मनपा निकालानंतर कनाननगर परिसरात तुफान दगडफेक

दिलीप पवार आणि मयूर पवार गटात दगडफेक झाल्याची माहीती
Kolhapur Breaking
मनपा निकालानंतर कनाननगर परिसरात तुफान दगडफेक
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणूक निकालानंतर कनाननगर परिसरात दगडफेक झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.याठिकाणी प्रभाग क्रमांक चारमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरच ही घटना घडल्याचे समजत आहे. यामध्ये महिलांचाही समावेश असल्याचे दिसून येते.

प्रभाग क्रमांक चार मधील दिलीप पवार आणि मयूर पवार गटात तुफान दगडफेक झाली असून निवडणुकीचा निकाल जाहीर होताच दोन्ही समर्थकांमध्ये झाली दगडफेक सुरु झाली. यावेळी पोलिस समोर असूनही एकमेकांवर दगडफेक सुरु होती. पोलिसांनी बळाचा वापर करुन दोन्ही गटांना बाजूला पांगवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news