

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. 227 जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीकडे केवळ मुंबईकरांचंच नाही, तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. कारण मुंबई महापालिका ही देशातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली महानगरपालिकांपैकी एक मानली जाते. त्यामुळे या निकालातून शहराच्या पुढील पाच वर्षांच्या कारभाराची दिशा तर ठरतेच, पण राज्यातील राजकीय समीकरणांवरही त्याचा मोठा प्रभाव पडणार आहे.
मुंबई - 277
भाजप - 100
काँग्रेस - 12
शिवसेना - 30
शिवसेना (UBT) - 66
मनसे - 8
इतर - 11
(पाच वाजेपर्यंतची आकडेवारी)
मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल एकामागोमाग जाहीर होत असताना प्रभाग क्रमांक ११२चा निकाल मात्र अजून प्रलंबित आहे. मतमोजणी सुरू असतानाच या प्रभागात काहीसा विलंब होत असल्याचं चित्र असून, मतमोजणीच्या तंत्रामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे ११२ मधील आघाडी-पिछाडीचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. संबंधित केंद्रावर अडचण दूर करून मतमोजणीची प्रक्रिया पुन्हा सुरळीत करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी काम करत आहेत. त्यामुळे हा निकाल इतर प्रभागांच्या तुलनेत थोडा उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीत एक मोठा आणि चर्चेत राहणारा निकाल समोर आला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. धारावी परिसरातील प्रभाग क्रमांक १८५ मध्ये हा निकाल लागला असून, या प्रभागातून शिवसेना (ठाकरे गट)चे जगदीश थेवलपी विजयी झाले आहेत.
रवी राजा हे मुंबई महापालिकेतील अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली होती. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि यावेळी भाजपकडून निवडणूक लढवली. त्यामुळे ही लढत केवळ एका प्रभागापुरती मर्यादित न राहता राजकीय प्रतिष्ठेची बनली होती.
मुलुंडमधील प्रभाग क्रमांक १०४ मधून भाजपाला मोठं यश मिळालं असून भाजपचे प्रकाश गंगाधरे विजयी झाले आहेत. या निकालानंतर मुलुंड परिसरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे.
दरम्यान, मतमोजणी सुरू असतानाच प्रभाग क्रमांक १११ मधील लढतही चुरशीची होताना दिसतेय. दुसऱ्या फेरीअखेर तिथे मतांची आकडेवारी समोर आली असून आघाडी-पिछाडीचं चित्र अधिक स्पष्ट झालं आहे. या प्रभागात शिवसेना (ठाकरे गट) चे दीपक सावंत यांनी मोठी आघाडी घेतल्याचं दिसत आहे. त्यांना ५,३५० मते मिळाली आहेत. तर भाजपच्या सारिका मंगेश पवार यांना ४,०४९ मते मिळाली असून त्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
या प्रभागात इतर उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे धनंजय पिसाळ यांना ४५० मते, वंचितचे रितेश केणी यांना ६२१, अपक्ष दत्ताराम पालेकर यांना ५८९, बसपचे प्रणित म्हात्रे यांना ६६ मते मिळाल्याची नोंद आहे. NOTA ला १९० मते मिळाली आहेत.
विभाग प्रमुख सुधीर मोरे यांच्या आत्महत्येनंतर शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या या जागेवर सर्वांचे लक्ष होते. मात्र त्यांचे भाऊ सुनील मोरे यांनी गड राखला असून प्रभाग क्रमांक १२३ मधून त्यांचा जोरदार विजय.
मुंबई महापालिका निवडणुकीत 227 पैकी 195 जागांवरील कल हाती आले आहेत. यात भाजप 87 तर शिंदेंची शिवसेना 25 जागांवर आघाडीवर आहे. ठाकरेंची शिवसेना 28, तर मनसे 8 जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेस 10 तर इतर पक्ष 7 जागांवर आघाडीवर आहे.
प्रभाग २०७ येथून अरुण गवळीची कन्या योगिता गवळीचा पराभव झाला आहे. भाजप उमेदवाराने या प्रभागात बाजी मारल्याचे वृत्त आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेच्या दोन बड्या नेत्यांना हादरा बसला आहे. वायकरांपाठोपाठ शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांना धक्का बसला आहे. त्यांचे चिरंजीव समाधान सरवणकर हे पराभूत झाले असून ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांचे भाऊ निशीकांत शिंदे विजयी झाले आहेत.
वॉर्ड क्रमांक ५०
विजयी -
राजपूत प्रतापसिंह - भाजप - १० हजार २७४
पराभूत -
तन्वी राव - ठाकरे गट - ७ हजार ७४०
वॉर्ड क्रमांक ५१
विजयी - वर्षा टेंबवलकर - शिवसेना - ११ हजार ५६७
पराभूत - आरती चौहान - शरद पवार गट - ६ हजार ३७
...........
वॉर्ड क्रमांक 182.
शिवसेनेचे मिलिंद वैद्य विजयी झाले असून त्यांना १२१८० मते मिळाली आहे. त्यांनी भाजपच्या राजन पारकर यांचा पराभव केला आहे. मिलिंद वैद्य हे ८००० मतांनी विजयी झाले आहेत.
चौथ्या फेरीअखेर शिंदेसेनेच्या दीप्ती वायकर यांना 10,293 मते. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या लीना रावत यांना 13, 424 मते मिळाली.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत पहिला निकाल जाहीर झाला असून दादरमधील प्रभाग क्रमांक 183 मध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. या प्रभागातून काँग्रेसच्या आशा दीपक काळे यांनी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत दणदणीत विजय मिळवला आहे.
मतमोजणीची सुरुवातच जोरात होत असताना “पहिला निकाल कुणाचा लागणार?” याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र हा पहिला धक्का भाजप किंवा ठाकरे गटाला नव्हे, तर काँग्रेसला बसला नाही—उलट काँग्रेससाठी हा निकाल मोठा बूस्टर ठरतोय.
आता उर्वरित प्रभागांचे निकाल कोणत्या दिशेने जातात, यावर मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरण स्पष्ट होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी जोरात सुरू असून आता हळूहळू निकालाचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. विशेषतः एम पूर्व वॉर्डमध्ये पहिल्या फेऱ्यांचे निकाल हाती यायला सुरुवात झाली असून, काही प्रभागांमध्ये आघाडी–पिछाडीचे कल दिसत आहेत.
मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच मतदारांचा कौल कोणत्या दिशेने जातोय, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या प्राथमिक कलांनुसार भाजपने आघाडी घेतल्याचं चित्र आहे.
एम पूर्व वॉर्डमधील निकाल पुढे येताच मुंबईतील इतर भागांमधील ट्रेंडही वेगाने स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पुढच्या काही फेऱ्यांमध्ये ही आघाडी टिकते की समीकरणं बदलतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिका मतमोजणीच्या पहिल्या तासात भाजप 11, शिंदे गट 10, ठाकरे गट 11, मनसे 6, काँग्रेस 5 तर इतर 3 जागांवर आघाडीवर आहेत. सत्तेसाठी 114 जागांचा आकडा गाठावा लागणार असून कोण ती रेषा ओलांडणार याकडे लक्ष आहे. दरम्यान, महायुतीला टक्कर देण्यासाठी ठाकरे गट–मनसे युती झाली असून शरद पवार गटानेही त्यांना पाठिंबा दिला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल हळूहळू स्पष्ट होत असताना पहिल्या कलांमध्ये भाजप-शिंदे युतीने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. मतमोजणी सुरू होताच अनेक वॉर्डमधून आघाडी–पिछाडीचे ट्रेंड समोर येऊ लागले आहेत. सध्याच्या माहितीनुसार भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) मिळून 22 जागांवर आघाडीवर आहेत. तर ठाकरे गट/विरोधकांची आघाडी सुमारे 10 जागांपर्यंत मर्यादित असल्याचे चित्र आहे.
पहिल्या कलांमध्ये मिळालेली ही आघाडी कायम राहते का, की पुढील फेऱ्यांमध्ये समीकरणं बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतमोजणीच्या पुढच्या टप्प्यांमध्ये चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.
नवी मुंबईत एकूण 9,48460 मतदारांपैकी 5,42074 मतदारांनी केले मतदान
नवी मुंबईत भाजप आणि शिवसेनेत कांटे की टक्कर
एकूण 57.16 टक्के मतदान झाले आहे.
एकूण नगरसेवक संख्या 111
सत्ताधारी भाजपा समोर शिवसेनेने यावेळेला तगडे आव्हान उभे केले आहे.
आरोप प्रत्यारोपाने ही निवडणूक रंगली होती
मतदानाची टक्केवारी
२०१२ - ४४.७५%
२०१७ - ५५.५९%
२०२६ - ५२.९४%
मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा फैसला आज होणार आहे. 227 जागांसाठी झालेल्या मतदानानंतर आता सगळ्यांच्या नजरा मतमोजणीकडे लागल्या आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतील 23 मतमोजणी केंद्रांवर एकाच वेळी मतमोजणीला सुरुवात झाली असून, दिवसभरात चित्र स्पष्ट होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतमोजणी सुरळीत पार पडावी यासाठी हजारो पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. कोणाचा झेंडा फडकणार आणि कोणाची घसरगुंडी होणार, याबाबत मुंबईकरांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
राज्यातील State Election Commission, Maharashtra यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी 10 वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर स्ट्राँगरूम आधीच सील करून ठेवण्यात आल्या असून, सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि नियंत्रित प्रवेश व्यवस्था लागू करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही भागात विशेष ट्रॅफिक नियोजनही करण्यात आले आहे.
मतमोजणीसाठी
– 759 पर्यवेक्षक
– 770 सहाय्यक
– 770 चतुर्थश्रेणी कर्मचारी
असा मोठा मनुष्यबळ तैनात करण्यात आला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना आधीच प्रशिक्षण देण्यात आले असून, प्रक्रिया वेळेत आणि अचूक पार पडावी यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
मुंबई महानगरपालिकेची सत्ता ही केवळ शहरापुरती मर्यादित नसून, राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी मानली जाते. त्यामुळे आजचा निकाल सत्ताधारी आणि विरोधकांसाठी कसोटीचा क्षण आहे.