

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरात विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरोघर फिरून एका शिक्षणसंस्थेचे विद्यार्थी- विद्यार्थिनी मतदारांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करत आहेत. मतदानावेळी बँक खात्यात पेटीएमद्वारे पैसे पाठविले जाण्यासाठी ही माहिती गोळा केली जात असल्याचे समजते. मतदारांनी काेणालाही आपल्या बँक खात्याचे तपशील देऊ नये. पुढे ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याचा धोका आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
कोणाच्या तरी खात्यातून मतदारांच्या खात्यात काळा पैसा पाठविणे, हे मनी लाँडरिंग आहे. मनी लाँडरिंगच्या प्रयत्नाची ईडीकडे तक्रार करणार असून, चौकशीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, मतदारांनी काेणालाही आपल्या बँक खात्याचे तपशील देऊ नये. पुढे ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याचा धोका आहे. अबकारी कर खात्याच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापुरातील दारू दुकानदारांची बैठक घेऊन काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी दबाव आणल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. काँग्रेसला पराभव दिसू लागल्याने सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होत आहे. परंतु, आम्ही सरकारी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारु, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचलंत का ?