Beed molestation case : विवाहितेचा विनयभंग; जाब विचारणाऱ्या पतीच्या डोक्यात लोखंडी गजाने वार, दोघांविरुद्ध गुन्हा

पीडित महिलेच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
Crime News
Crime News
Published on
Updated on

केज : तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्यानंतर तिच्या पतीने जाब विचारताच त्याच्या डोक्यात लोखंडी गजाने वार करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Pune Crime News: मांसाहारी जेवणावरून वाद; मारहाणीत मुलाचा मृत्यू; आई-वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २ वाजता पीडित महिला घरात एकटी असताना आबा गोरख गायकवाड याने घरात घुसून "तू मला आवडतेस" असे म्हणत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर तिच्याशी झोंबाझोंबी करत पदर ओढून विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Crime News
Nahsik Crime News | गणपती वर्गणीचा वाद ठरला प्राणघातक! सुरगाण्यातील 29 वर्षीय तरुणाची सापुताऱ्यात हत्या

घडलेला प्रकार महिलेने आपल्या पतीला सांगितल्यानंतर २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पतीने आरोपीकडे जाब विचारण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी गोरख उत्तरेश्वर गायकवाड याने लोखंडी गजाने पतीच्या डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली. यानंतर आबा गोरख गायकवाड आणि गोरख उत्तरेश्वर गायकवाड या दोघांनी संगनमत करून पीडित महिला व तिच्या पतीला चापट-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.

Crime News
Crime News : गळा चिरलेला अन् शेवटचा श्वास... मृत्यूच्या दाढेतून महिलेने कागदावर रक्ताने लिहिले मारेकऱ्याचे नाव!

पीडित महिलेच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४६/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ११५(२), ११८(१), ३३३ आणि ३५२ अन्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस जमादार पल्लवी तरकसे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news