Abhijit Dipke on Gokul: सतेज पाटलांना अभिजित दिपकेची साथ! गोकुळच्या राजकारणावर सीजेपी प्रमुख पहिल्यांदाच बोलला

गोकुळसाठी वकिलांना तब्बल ८० लाख रुपये देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सीजेपी प्रमुख अभिजीत दिपके यांनी यावरूनच राज्य सरकारवर टीका केली आहे.
Abhijit Dipke, Satej Patil
Abhijit Dipke, Satej PatilFile Photo
Published on: 
Updated on: 

Abhijit Dipke on Gokul Politics:

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'मधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचे समर्थन करण्यासाठी वकिली शुल्कापोटी सरकारी तिजोरीतील तब्बल ८० लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. हाच धागा पकडत सीजेपी प्रमुख अभिजित दिपके यानेही आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारला धारेवर धरले आहे. विशेष म्हणजे, गोकुळच्या राजकारणावर अभिजित दिपकेने पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले आहे.

अभिजित दिपके काय म्हणाले?

अभिजीत दिपके याने आज (दि. 26) संविधान दिनी ऐतिहासिक दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी त्याच्यासोबत आशुतोष रांका उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, "उद्यापासून आम्ही दुष्काळी भागात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत तसेच शेतकऱ्यांच्या मुलांसोबत संवाद साधणार आहोत. शेतात कष्ट करून हाताला काहीच मिळत नाही, अशी सध्याची स्थिती आहे. गोकुळमध्ये जे झाले ते फार वाईट झाले आहे. एका-एका वकिलाला ८० लाख रुपये देण्यात येत असल्याचे मी ऐकले आहे. पण, सरकार शेतकऱ्यांना किती देते? सत्ता बळकावण्यासाठी वकिलांना ८०-९० लाख आणि शेतकऱ्यांना ५ हजार रुपये, सरकारसाठी काय महत्त्वाचे आहे हे पाहा," असे दिपके याने म्हटले आहे.

Abhijit Dipke, Satej Patil
Gokul News : गोकुळची वार्षिक सभा २० डिसेंबरनंतर शक्य

यावेळी दिपके पुढे म्हणाला की, "आजचा दिवस देशातील सर्वांसाठी फार पवित्र दिवस आहे. आजच्या दिवशी बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिले. आज सायंकाळी नागपुरात 'संविधान बचाव, लोकशाही बचाव' रॅलीची सुरुवात करणार आहोत. आशुतोष रांका आणि प्रकाश राज या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जे आवाज उठवून प्रश्न विचारतील, त्यांची गळचेपी कशी करता येईल हेच या सरकारला करता येते. या सरकारला हे कळत नाही की, सत्ता त्यांच्याकडे असली तरी बाबासाहेबांचे संविधान आमच्या बाजूने आहे. कोणताही हुकूमशहा (तानाशहा) जनतेचे अधिकार संपवण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा हे संविधान त्यांचे रक्षण करेल. तिरंगा फडकावल्यामुळे आशुतोषला आठ दिवस तिहार तुरुंगात ठेवले आणि मला एक दिवस अटक केली. मात्र, यात संविधानाने आम्हाला वाचवले. त्यामुळे प्रत्येक नागरिकाचे अधिकार वाचवण्यासाठी आपल्याला संविधान वाचवणे गरजेचे आहे," असेही दिपके म्हणाला.

'गोकुळ'ची सुनावणी ३ डिसेंबरला

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळमध्ये नियुक्त केलेले चार शासन नियुक्त संचालक आणि त्यांना दिलेला मतदानाचा अधिकार यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुरू असलेली सुनावणी आता ३ डिसेंबरला दुपारी ४ वाजता होणार आहे. बुधवारच्या सुनावणीत समविचारी आघाडीतर्फे दोन्ही याचिकांबाबत दुरुस्ती अर्ज सादर केला. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

सतेज पाटलांनी काय आरोप केले?

"गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी साम, दाम, दंड आणि कपटाचा वापर करणाऱ्या महायुती सरकारचा कारनामा पाहा! एकीकडे राज्यात दुष्काळामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे आणि विकासकामांसाठी निधी कमी पडत आहे. अशा परिस्थितीत गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचे समर्थन करण्यासाठी वकिली शुल्कापोटी सरकारी तिजोरीतील तब्बल ८० लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली," असा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे.

Abhijit Dipke, Satej Patil
Gokul Milk Price Hike | ७० कोटींची तूट भरून काढण्‍यासाठी ‘गोकुळ’कडून दूध दरवाढीचा निर्णय?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.