कोल्हापूर : सत्ताधारी गटातील काहींनी दगाबाजी केल्याने प्रकाश आवाडेंचा पराभव; विनय कोरेंचा हल्लाबोल

विनय कोरे
विनय कोरे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने अपेक्षेनुसार बाजी मारली असली, तरी आमदार प्रकाश आवाडेंचा पराभव झाल्याने धक्का बसला आहे. या पराभवानंतर आमदार विनय कोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना सत्ताधारी गटातील काहींनी दगाबाजी केल्याने त्यांचा पराभव झाल्याचा आरोप केला आहे. सत्ताधारी आघाडीला जिल्हा बँकेत १८ जागा मिळाल्या.

भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी शाहू आघाडी पॅनल रिंगणात होते. सत्ताधारी गटातील जिल्ह्यातील सर्वच मातब्बर नेते निवडून आले, पण पतसंस्था गटातून आमदार प्रकाश आवाडेंना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे हा पराभव विनय कोरेंच्या जिव्हारी लागला.

जे काही पाप ज्या लोकांच्या हातून झालं आहे त्याला योग्यवेळी किंमत मोजावी लागेल कोल्हापूर जिल्हा सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवेल असा इशाराही त्यांनी दिला.

विनय कोरे पुढे म्हणाले की, सत्ताधारी गटाने पूर्ण ताकतीने पाठीशी राहिले असते तर शिवसेना विरोधी आघाडीला एकही जागा जिंकता आली नसती, पण सत्ताधारी गटातील काही नेत्यांनी दगाबाजी केल्याने प्रकाश आवाडे यांना पराभव स्वीकारावा लागला. आवाडेंच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news