कोल्हापूर जिल्हा बँक : शाहुवाडीत सत्ताधारी गटाला धक्का, सर्जेराव पाटील- पेरीडकर पराभूत, रणवीर गायकवाड विजयी | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक : शाहुवाडीत सत्ताधारी गटाला धक्का, सर्जेराव पाटील- पेरीडकर पराभूत, रणवीर गायकवाड विजयी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. आता मतदानानंतर सहा उमेदवार निवडून आले आहेत. शाहुवाडीत सत्ताधारी गटाला धक्का बसला आहे. सर्जेराव पाटील – पेरीडकर पराभूत झाले आहेत. तर रणवीर गायकवाड निवडून आले आहेत. रणवीर गायकवाड यांना ९९ तर सर्जेराव पाटील – पेरीडकर यांना ६६ मते मिळाली आहेत.

आजाऱ्यातील विद्यमान संचालक अशोक चराटी पराभूत झाले आहेत. सत्ताधारी गटाचे सुधीर देसाई विजयी झाले आहेत. सुधीर देसाई यांना ५७ तर अशोक चराटी यांना ४८ मते मिळाली आहेत.

कोल्हापूर जिल्हा बॅंक निवडणुकीत शिरोळमधून मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी झाले आहेत. ‘दत्त’चे चेअरमन गणपतराव पाटील यांना ५१ मते, तर यड्रावकर यांनी ९८ मते मिळाली आहे.

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणूक मतमोजणीला आज शुक्रवारी (दि.७) सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. मतपेट्या उघडताच त्यात मतदारांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या सापडल्या. या चिठ्ठ्यांमध्ये काही मतदारांनी नेते, उमेदवारांना उद्देशून सूचना केल्या आहेत. ‘आम्हाला वाटायचं साहेबांचे कार्यकर्ते भाजप वाढवत आहेत. पण साहेब सुद्धा…आता काय?. सर्व उमेदवार राजकारणी असून आज एकमेकांवर पकड करत आहेत. पण निवडणूक झाल्यानंतर पुन्हा गळ्यात गळे घालणारे स्वार्थी लोक बँकेवर कायम राहणार. त्यासाठी प्रशासक असणे आवश्यक आहे,’ असे मतदारांनी लिहिले आहे.

Back to top button