कोल्हापूर जिल्हा बँक : शिरोळमधून राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक : शिरोळमधून राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी

शिरोळ : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्हा बॅंक निवडणुकीत शिरोळमधून मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी झाले आहेत. ‘दत्त’चे चेअरमन गणपतराव पाटील यांना ५१ मते, तर यड्रावकर यांनी ९८ मते मिळाली आहे.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर सर्वांना निकालाची उत्सुकता लागली होती. उमेदवार व त्यांचे समर्थक कार्यकर्ते आकडेमोड सुरू करून किती मते पडतील, याचा अंदाज घेत होते. मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व ‘दत्त’चे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या निकालाकडे नजरा लागल्या होत्या.

गणपतराव पाटील यांच्या पाठीशी शिरोळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेते असल्याने जिल्हा बँकेवर कोणाची वर्णी लागणार यावर जिल्हासह राज्याचे याकडे लक्ष लागून राहिले होते. पण अखेर निवडणुकीत राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बाजी मारली आहे.

गुरुवारी रात्री जिल्हा बँकेचे उमेदवार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या विजयाचे फलक जयसिंगपूर शहरात लावण्यात आले. सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन दत्त कारखान्याचे चेअमरन गणपतराव पाटील यांना रिंगणात उभे केल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष शिरोळच्या घडामोडींकडे लागले होते.

यड्रावकर गटाने 100 हून अधिक मतांनी विजय होणार असल्याचा दावा केला होता, तर गणतपराव पाटील यांनीही विजयाचा दावा केला होता.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : या राजकीय घडामोडींनी गाजले 2021 साल | Rewind 2021

Back to top button