कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा
वाघबीळ ते पन्हाळा जाणाऱ्या रोडवर बांबरवाडी ( ता. पन्हाळा) गावच्या हद्दीत पिस्तूल विक्रीस आलेल्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दिलीप मारुती पाटील (वय.४१, रा. पिंपळ तर्फ सातवें पैकी बांबरवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.
बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी वाघबीळ- पन्हाळा येथील रोडवरील बांबरवाडी (ता. पन्हाळा) गांवचे हद्दीत साईराज बिअरशॉपी समोर एकजण येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अमंलदार सुनिल कवळेकर, अजय वाडेकर, संदीप कुंभार, अमोल कोळेकर व अमोल कोळेकर सापळा रचला.
लावलेल्या सापळ्यात दिलीप मारुती पाटील हा अडकला. यानंतर त्याच्याकडील ५० हजार रूपये किंमतीचे गावठी बनावटीचे १ पिस्तुल, २०० रूपये किंमतीचा १ जिवंत राऊंड आणि मोबाईल असा एकूण ५५ हजार २०० रूपये किंमतीचे मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यानंतर मुद्देमालासह पन्हाळा पोलीस ठाण्यात त्याला हजर करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, शेष मोरे तसेच पोलीस अमंलदार सुनिल कवळेकर, संदीप कुंभार, नितीन चोथे, अमोल कोळेकर, अजित वाडेकर, ओंकार परब, तुकाराम राजीगरे, सागर कांडगांवे, संजय पडवळ, संतोष पाटील, महेश गवळी, अजय गोडबोले व पांडूरंग पाटील यांनी केली आहे.
हेही वाचलंत का?