children vaccinated : राज्यात मुलांच्या लसीकरणात धुळे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर; ९ हजारांवर ‘लसवंत’ | पुढारी

children vaccinated : राज्यात मुलांच्या लसीकरणात धुळे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर; ९ हजारांवर 'लसवंत'

धुळे, पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर संपूर्ण राज्यभरात पंधरा ते अठरा वयोतील मुला-मुलींना कोरोनाची पहिली लस (children vaccinated) देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या लसीकरणास धुळे जिल्ह्यातून देखील विक्रमी प्रतिसाद मिळतो आहे. यामध्ये एकाच दिवसात धुळे जिल्ह्यामध्ये ९ हजार ३८१ मुला-मुलींना कोरोनाची लस देण्यात आली आहे. संपूर्ण राज्यामध्ये लसीकरणा संदर्भात विक्रमी लसीकरण यादीमध्ये धुळे जिल्ह्यात झाले आहे. राज्यात धुळ्याच्या लसीकरणाचा दुसरा क्रमांक नोंदविला गेला आहे.

कोरोना प्रतिबंध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वर्षादरम्यान बालकांना लसीकरण करण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यात आरोग्य विभागातर्फे व जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या आवाहनानंतर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आले आहे. सामाजिक संघटनांनी देखील या कामात सहभाग नोंदवला. यामुळे राज्यामध्ये विक्रमी लसीकरण करण्यात धुळे जिल्ह्याचा  दुसरा क्रमांक नोंदविण्यात आला असल्याचे देखील आरोग्य प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते आहे. कोरोनाला नमावण्यासाठी यापुढे देखील विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी  विविध उपक्रम राबवून प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

राजकीय व सामाजिक संघटनांनी लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉइंट तयार केला असून तसेच लसीकरण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यास वही-पेन वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये लसीकरण संदर्भात जनजागृती निर्माण झाल्याने विक्रमी लसीकरण होण्याकरिता प्रशासनाला या संघटनांचा चांगलाच हातभार लागला असून दिवसभरात झालेल्या लसीकरणात जवळपास ८.२७ टक्‍के लसीकरण प्रशासनाच्या प्रयत्नानंतर झाले आहे. (children vaccinated)

हेही वाचलंत का? 

Back to top button