वडगाव बाजार समिती निवडणूक : ग्रामपंचायत, हमाल तोलाई, व्यापारी गटात सत्ताधारी विजयी | पुढारी

वडगाव बाजार समिती निवडणूक : ग्रामपंचायत, हमाल तोलाई, व्यापारी गटात सत्ताधारी विजयी

पेठवडगाव : पुढारी वृत्तसेवा

येथील वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील ग्रामपंचायत, हमाल तोलाई गटातील सत्ताधारी राजेश्री शाहू शेतकरी विकास आघाडीचे पाच उमेदवार विजयी झाले.

ग्रामपंचायत गटातील सर्वसाधारण गटातील सुनीता चव्हाण – ४०२, राजू मगदूम -४१०, अनुसूचित जाती जमाती- नितीन कांबळे- ४११, आर्थिक दुर्बल वसंत खोत- ४७२, हमाल तोलाई- नितीन चव्हाण- ४३, व्यापारी गटात- सागर मुसळे ४७२, संजय वठारे ४७६ मते घेऊन विजयी झाले आहेत. सताधारी आघाडीने विरोधी महाविकास आघाडीवर सर्वच जागांवर निर्विवाद विजय मिळवला.

दरम्यान, वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी राजेश्री शाहू शेतकरी आघाडीने विरोधी महाविकास आघाडीवर सोसायटी गटात ३९८ मताधिक्य ठेवून सर्वच ११ जागांवर विजयी मिळविला. सेवा सोसायटी गटात विजयी घोडदौड सुरू येथील नगरपालिका चौकात आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला.

हे ही वाचा :

Back to top button