वडगाव बाजार समिती निवडणुकीत सेवा सोसायटी गटात ११ जागेवर सत्ताधारी विजयी, विरोधी महाविकास आघाडीचा धुव्वा

वडगाव बाजार समिती निवडणुकीत सेवा सोसायटी गटात ११ जागेवर सत्ताधारी विजयी, विरोधी महाविकास आघाडीचा धुव्वा
Published on
Updated on

पेठवडगाव : पुढारी वृत्तसेवा

वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी राजेश्री शाहू शेतकरी आघाडीने विरोधी महाविकास आघाडीवर सोसायटी गटात ३९८ मताधिक्य ठेवून सर्वच ११ जागांवर विजयी मिळविला. सेवा सोसायटी गटात विजयी घोडदौड सुरू येथील नगरपालिका चौकात आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला. दरम्यान, ग्रामपंचायत, अडते व्यापारी, आदी गटाची मतमोजणी संथगतीने सुरू आहे.

सेवा सोसायटी गटात आघाडीचे विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते- किरण इंगवले ९१२, विलास खानविलकर- आण्णासो डिंगर्जे- ८९५, जगोंडा पाटील ८८२, शिवाजी पाटील ८७९, सुरेश पाटील ८८५, बी जी बोराडे ८५६, वैशाली नरंदेकर ८६२, भारती चौगुले ८९४, चांद मुजावर ८८२, घुळगोंडा डावरे ८७८.

अन्य गटाची मतमोजणी सुरू असून दुपारी २ वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आणि हातकणंगले उपनिबंधक डॉ. प्रगती बागल यांनी दिली.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : अखेर कुत्र्यांची हत्या करणाऱ्या वानरांना केले जेरबंद…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news