

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा
क्रीडा संकुल कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व के. आय. टी. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, इंटर कॉलेज स्पर्धेमध्ये छ. राजाराम महाराज टिंबर मार्केट येथील ऑलिम्पिक टारगेट शुटिंग अकॅडमीचे खेळाडू प्रतिक जोंग याने ४०० पैकी ३९७ गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. तर ऐश्वर्या नारायण पाटील हिने ४०० पैकी ३९२ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
या दोघांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारात सहभाग घेतला होता. कनक प्रशांत शिंदे हिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ४०० पैकी ३७१ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. या सर्वांची निवड ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा फरिदाबाद, हरियाणा २०२१ साठी झाली आहे.त्यांना प्रशिक्षक विनय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अकॅडमी चे संचालक सचिन पाटील, तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण, सुहास जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
हेही वाचा