Amal Mahadik : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालकपदी अमल महाडिक यांची बिनविरोध निवड

Amal Mahadik : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालकपदी अमल महाडिक यांची बिनविरोध निवड
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालकपदी माजी आमदार अमल महाडिक यांची बिनविरोध निवड झाली. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांच्याबरोबर विरोधी गटाचे माजी आमदार अमल महाडिक यांची बिनविरोध निवड झाली आहे. हातकणंगले संस्थागटातून महाडिक यांच्याविरोधात शिरीष देसाई यांनी अर्ज दाखल केला होता. देसाई यांनी माघार घेतल्याने महाडिक यांची बिनविरोध निवड झाली. (Amal Mahadik)

माजी आमदार महादेव महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा बँकेसाठी महाविकास आघाडीच्या विरोधात पॅनेल केले आहे. माजी आमदार महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन केले होते. महाडिक यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून शिरीष देसाई यांनी आपला अर्ज दाखल केला होता.

आज (दि.२१) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून, चर्चेतून मार्ग न निघाल्यास सत्ताधारी उर्वरित तीन जागा तसेच शिवसेना संपूर्ण १९ उमेदवारांची घोषणा करणार आहे.

Amal Mahadik : माजी खासदार राजू शेट्टी यांची भुमिका महत्वाची

पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा बँकेत एक जागा देण्याचे आश्‍वासन दिले होते. अनुसूचित जाती-जमातीची जागा काँग्रेसच्या कोट्यात आहे, ती जागा तुम्हाला आम्ही देऊ शकतो, त्यासाठी अन्य नेत्यांना विचारण्याची आवश्यकता नाही, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले होते.

आयत्यावेळी जर पाठीत खंजीर खुपसला जात असेल तर तो खंजीर उलटा करायला आम्हाला वेळ लागणार नाही. स्वाभिमानी संघटनेला एक जागा द्यायला काहीच अडचण नव्हती. त्यामुळे आमचा विचार केला नाही तर आम्हाला देखील पर्याय खुले आहेत. विकास सेवा संस्था गटाचा येथे विषयच नाही. या गटातील निवडणूक प्रत्येकजण आपापल्या ताकदीवरच लढत असतो. त्याप्रमाणे शिरोळमधून गणपतराव पाटील निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे स्वीकृतच्या पर्यायाचा प्रश्‍नच येत नाही. त्याबाबतचा स्वाभिमानी संघटनेकडेही कोणी प्रस्ताव दिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरे, आवाडेंचा प्रस्ताव धुडकावला

मंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्यासाठी आ. विनय कोरे व आ. प्रकाश आवाडे आपल्याकडे येऊन गेले. परंतु, त्यांनी दिलेला प्रस्ताव आपण धुडकावून लावल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

शिरोळचा तिढा कायम

गणपतराव पाटील यांच्या माघारीसाठी सर्व नेत्यांनी देव पाण्यात घातले आहेत. परंतु, या गटातून राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज असल्याने शिरोळच्या जागेचा तिढा कायम आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news