Minister Shashikala Jolle : कर्नाटकच्‍या मंत्री शशिकला जोल्ले यांचे बांधकाम शिवसैनिकांनी पाडले बंद | पुढारी

Minister Shashikala Jolle : कर्नाटकच्‍या मंत्री शशिकला जोल्ले यांचे बांधकाम शिवसैनिकांनी पाडले बंद

कोल्हापूर ; पुढारी ऑनलाईन : बंगळूर येथे शिवपुतळ्याची विटंबना घटनेचा तीव्र निषेध कोल्हापूर, बेळगावमध्‍ये व्‍यक्‍त हाेत आहे.बेळगावात शेकडो युवक धर्मवीर संभाजी चौकात जमून आंदोलन केले. यावेळी काही वाहनांवर दगडफेक झाली. दरम्यान कर्नाटक सरकारच्या मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार आण्णासाहेब जोल्ले यांचे कोल्हापुरात सुरू असलेले बांधकाम शिवसैनिकांनी बंद पाडले आहे. (Minister Shashikala Jolle)

कोल्हापुरातील शाहू नाक्याजवळ मंत्री जोल्ले आणि खासदार जोल्ले यांचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान बंगळूरमध्ये घडलेल्‍या घटनेचा निषेध करत शिवभक्तांनी हे काम बंद पाडले आहे. या वेळी  हर्षल सुर्वे, प्रदीप हांडे, शुभम जाधव, प्रणव पाटील, संकेत खोत, युवराज हल्दीकर, आकाश जाधव, अतुल सांगावकर, सुरज एकशिंगे, मंगेश शिंदे आदी उपस्थित होते.

Minister Shashikala Jolle : मंत्री जोल्ले यांच्याकडून बंगळूर घटनेचा निषेध

राष्ट्रपुरुषांच्या नावाचा गैरवापर करून समाजातील शांतता, सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रय़त्न कुणीही करू नये. बंगळूर व बेळगाव येथील घटना सरकारने गंभीरपणे घेतल्या असून कायदा आणि सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांना कठोर शासन देण्यासाठी सरकार कटीबध्द असल्याचे प्रतिपादन मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले आहे.

बेळगावात २७ जणांना ताब्यात घेतले

बंगळूर येथे शिवपुतळा विटंबनाप्रकरणी बेळगावात शनिवारी सकाळपासून जमावबंदी आदेश जारी केला आहे. शुक्रवारी रात्री शहरात ठिकठिकाणी दगडफेक प्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले असून २७ जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. बंगळुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेला क्षुल्लक बाब म्हणत मुख्यमंत्री बोम्मई यांनी मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button