son murdered his father : कोल्हापूर जिल्ह्यात मुलाकडून बापाचा खून, अनैतिक संबंधाच्या गैरसमजातून कृत्य | पुढारी

son murdered his father : कोल्हापूर जिल्ह्यात मुलाकडून बापाचा खून, अनैतिक संबंधाच्या गैरसमजातून कृत्य

मोहरे (जि. कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा

पन्हाळा तालुक्यातील माले येथे वडिलांचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे गैरसमजातून मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी फावड्याचा वर्मी घाव घातला. (son murdered his father) यात भिकाजी शंकर वगरे (वय ४७) हे जागीच कोसळल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ही घटना गुरुवारी मध्यरात्री गावच्या मध्यस्तीमध्ये घडली. या प्रकरणी मुलगा अजितला कोडोली पोलिसांनी खूनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत भिकाजी वगरे यांचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या गैरसमजातून पत्नी व मुलगा यांच्यात वारंवार वाद होत असत. एक महिन्यांपूर्वी भिकाजी व त्याचा मुलगा अजित यांच्यामध्ये वाद झाला होता. (son murdered his father)

गुरुवारी रात्री याच कारणावरून त्यांच्या राहत्या घरी त्यांची पत्नी आणि भिकाजी यांच्यात जोरदार वाद झाला. यावेळी चिडून भिकाजीने आपल्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी त्यांचा मुलगा अजितने आपल्या वडिलांना आईला का मारहाण केली ? असा जाब विचारला. त्यामुळे मुलगा व वडील यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेला.

त्यातून मुलगा अजितने रागाच्या भरात घरातील लोखंडी फावडे वडिलांच्या डोक्यात घातले. डोक्यात वर्मी घाव लागल्याने भिकाजी जमिनीवर कोसळले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भिकाजी यांना तत्काळ उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (son murdered his father)

Rohit Sharma Salary : कॅप्टन झाल्यानंतर रोहितचा पगार विराटपेक्षा जास्त असेल का? जाणून घ्या…

वडिलांना गंभीर जखमी करून मुलगा त्याच रात्री पसार झाला होता. या घटनेची माहिती कोडोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी संशयित आरोपी अजितचा रात्रभर शोध घेऊन पहाटे खुनाच्या आरोपाखाली अटक केली. या घटनेची फिर्याद पोलीस पाटील यांनी दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शितल कुमार डोईजड करत आहेत.

Back to top button