कोल्हापूर : कागलमध्ये बंगला फोडून दहा तोळे दागिन्यांसह रोकडवर डल्ला | पुढारी

कोल्हापूर : कागलमध्ये बंगला फोडून दहा तोळे दागिन्यांसह रोकडवर डल्ला

कागल; पुढारी वृत्तसेवा : कागल शहरातील बांधकाम व्यवसायिक सुशांत विजय भालबर (रा. शाहू कॉलनी) यांचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी कपाटातील दहा तोळे सोने आणि रोख तीस हजार रुपये चोरून नेले. ही घटना रविवारी (दि.२६) ते बुधवारी (दि.२९) या दरम्यान घडली. बंद बंगला शोधून काढत पाळत ठेवून चोरट्यानी सोन्या-चांदीच्या दागिन्यावर डल्ला मारला

सुशांत भालवर हे रविवारपासून सहकुटुंब सहलीला बाहेरगावी गेले होते. ते बुधवारी (दि.३०)  दुपारी सव्वाचार वाजता सहलीवरुन आले. यावेळी बंगल्याचा दरवाजा निखळल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनंतर बंगल्यात जाऊन पाहिले असता बंगल्यातील तीन बेडरूममधील कपाटे फोडून दहा तोळ्याचे विविध प्रकारचे दागिने आणि रोख तीस हजार रुपये तसेच फॉरेन करन्सी चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी कागल पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत फिर्याद दाखल केली. श्वान पथकांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button