सोलापूर: रामवाडी येथे मोटार काढताना उजनी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

Rushikesh wargad
Rushikesh wargad

करमाळा: पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील रामवाडी येथील उजनी नदीच्या पात्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. ऋषिकेश बाळासाहेब वारगड (वय १७)  असे मृत तरुणाचे  नाव आहे. ही घटना आज (दि.२९)  सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रामवाडी -निमतवाडी येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, ऋषिकेश हा भाऊ व चुलता यांच्यासमवेत उजनी नदीतील मोटर पाइप व केबल काढण्यासाठी सकाळी नऊच्या सुमारास पाण्यात उतरला होता. तो पोहत मोटारी जवळ जात असताना आलेल्या मोठ्या लाटेत त्याच्या नाका तोंडत पाणी जाऊन तो बुडाला. ग्रामस्थांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले असता तो जागीच मृत झाला होता. सध्या उजनीची पाण्याची पातळी खालावली असल्याने शेतकऱ्यांनी उजनीच्या पात्रात दूरवर मोटारी बसावल्या आहेत. मात्र, गेल्या तीन चार दिवसांपासून पुणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. काही ठिकाणी जोराच्या लाटा येत आहेत. त्यामुळे मोटारी वर घेण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. अशीच मोटर वर घेण्यासाठी ऋषीकेश पाण्यात उतरला होता. मात्र जोरात आलेल्या लाटेत तो बुडल्याने त्याचा मृत्यू  झाला.

सध्या कुगाव येथील बोट दुर्घटनेतिल घटना ताजी असताना पुन्हा उजनीच्या पाण्यत बुडून एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला आहे.
ऋषिकेश हा कर्जत (जि. अहमदनगर) येथे शिक्षण घेत होता. नुकताच तो इयत्ता बारावीची परिक्षा चांगल्या गुणांनी पास झाला होता. त्याच्या दुर्दैवी जाण्याने संपूर्ण रामवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

उजनीतील पाणी खाली सोडल्यामुळे धरणग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या मोटारी दिवसेंदिवस पाण्याचे मागे पळत नदीपात्रात जावे लागले होते. पुणे जिल्ह्यातील बंधाऱ्याची दारे जून महिन्यामुळे वर करण्यात आल्याने चास कमानच्या धरणातील पाणी उजनी धरणात काही प्रमाणात आले. त्यामुळे या पात्रात पाणी वाढल्याने रामवडी भागातील शेतकरी मोटारी व पाईप गोळा करून कडेला आणण्यासाठी प्रयत्न करत होते. ही वेळ केवळ धरणातील पाणी खाली सोडल्यामुळे आली आहे. त्यामुळे या युवकाचा बळी या उजनीच्या नियोजन शून्य धोरणामुळे झाला आहे. यासाठी आता तरी उजनीच्या सल्लागार समितीत धरणग्रस्त शेतकऱ्यांनाच सहभागी करून घ्यावे. जेणेकरून अशा दरवर्षी घडणाऱ्या दुर्दैवी घटना टाळता येतील.ृ

अजित रणदिवे, माजी उपसरपंच, रामवाडी (ता. करमाळा)

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news