पी. एन. पाटील राजकारणाच्या पलिकडे जाऊन मैत्री जपणारे : शाहू महाराज | पुढारी

पी. एन. पाटील राजकारणाच्या पलिकडे जाऊन मैत्री जपणारे : शाहू महाराज

पुढारी ऑनलाईन डेस्क :  पी. एन. पाटील यांच्‍यासारख्या निष्ठावंत नेत्याच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो व कुटुंबियांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो. राजकारणाच्या पलिकडे जाऊन मैत्री जपणारे व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले. करवीर विधानसभा मतदार संघाचे आमदार पी.एन. पाटील यांना भावपूर्ण श्रध्दांजली!आमच्या परिवाराचे  व त्यांचे घनिष्ठ संबंध होते.त्यांच्या अकाली निधनामुळे जिल्ह्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो, अशा शब्दांत शाहू महाराज छत्रपती यांनी आमदार पी.एन.पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे.(MLA P N Patil)

दुपारी १ वाजता अंतिम संस्कार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी. एन. पाटील (MLA P N Patil) यांचे आज (दि.२२) पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कोल्हापुरवर शोककळा पसरली आहे. सकाळी १० वाजता पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस कमिटी येथे आणण्यात येणार आहे. ११ वाजता सडोली येथे नेण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता अंतिम संस्कार होणार आहेत. पी. एन. पाटील (MLA P N Patil) रविवारी (दि. १९) सकाळी निवासस्थानी बाथरूममध्ये तोल जाऊन पडले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबई व  कोल्हापूर येथील विशेष वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांच्यावर त्वरित शस्त्रक्रिया केली होती. गेल्या आठवडाभरापासून त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास सुरू होता.

हेही वाचा 

Back to top button