

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज (दि.७) १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९३ जागांसाठी मतदान होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील मतदान केंद्रावर तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीतील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात आहेत.
तिसऱ्या टप्प्यासाठी आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यातील उमेदवारांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातच्या गांधीनगरमधून, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (गुणा, मध्य प्रदेश), मनसुख मांडविया (पोरबंदर, गुजरात) आणि प्रल्हाद जोशी (धारवाड, कर्नाटक) यांचा समावेश आहे. दरम्यान, अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. रांगेत उभे राहून पंतप्रधान मोदी यांनी मतदान केले.
लोकसभा निवडणुक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यात आज ७ मे रोजी ११ राज्यांमधील ९३ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण १३३१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानाची वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत आहे. काही लोकसभेच्या जागांवर मतदान ४ वाजता संपेल. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशातून १०, गुजरातमधून २५, कर्नाटकातून १४, महाराष्ट्रातील ११, मध्य प्रदेशातून ९, आसाममधून ४, बिहारमधून ५, छत्तीसगडमधून ७, पश्चिम बंगालमधून ४, दमण दीव आणि दादरा-नगर हवेलीच्या २ जागांवर मतदान होत आहे.
हेही वाचा :