Lok Sabha Election 2024 : स्वाभिमानी रयत शाहू महाराजांच्या पाठिशी : मालोजीराजे छत्रपती | पुढारी

Lok Sabha Election 2024 : स्वाभिमानी रयत शाहू महाराजांच्या पाठिशी : मालोजीराजे छत्रपती

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी रयत शाहू महाराजांच्या पाठिशी आहे. कोण काय बोलतं याकडे आम्ही लक्ष देत नाही, त्यांना उत्तर द्यायला कोल्हापूरची स्वाभिमानी जनता तयार आहे. ही वैचारिक लढाई आहे, असे सांगत माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आज (दि. १६) उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून आघाडीतील घटक पक्षांचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी आलेले माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधला. “लोकांच्या मनात जे होते ते आज घडत आहे. लोकांना बदल हवा आहे. लोकांना शाहूंची विचारधारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे न्यायचे आहेत. मतदारसंघात लाोकांचा उत्साह आहे. लोकं बदल घडविल्याशिवाय राहणार नाहीत. महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित काम करत आहेत. विचारांवर या लढाईला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button