Kolhapur News : कोल्हापूर : मादळेत भीषण पाणी टंचाई; हंडाभर पाण्यासाठी वनवन | पुढारी

Kolhapur News : कोल्हापूर : मादळेत भीषण पाणी टंचाई; हंडाभर पाण्यासाठी वनवन

कासारवाडी; पुढारी वृत्तसेवा : मादळे (ता. करवीर) येथे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने महिलांना पाण्यासाठी शेतात भटकावे लागत आहे. जल जीवन मिशन योजना पूर्ण करून गावचा पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी नागरिकांच्यातून होत आहे. येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरवेल कोरड्या पडल्याने गावात पाणी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे गावातील महिला व नागरिकांना पाण्यासाठी शेतातील बोरवेल व इतर स्तोत्रांचा आधार घ्यावा लागत आहे. महिलांना पहाटेपासूनच पाण्यासाठी रांग लावावी लागत आहे.
(Kolhapur News)

जनावरांना पाणी तर अवघड झाले आहे. सादळे मादळे परिसर दिसायला सुंदर असला तरी सध्या येथे भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. गावाच्या आजूबाजूला असलेल्या फार्म हाऊसवर अनेकांनी बोरवेल मारल्याने पाणी पातळी खालवली आहे. गावासाठी जल जीवन मिशन योजनेचे काम अद्याप अपूर्ण आहे याची पाईपलाईन काही ठिकाणी उघड्यावरच टाकली आहे. (Kolhapur News)

या कामाबाबत स्पष्टता नाही. कामाची माहिती मिळत नाही. ठेकेदार फोन उचलत नाहीत. ग्रामपंचायतला पाणी पाईपलाईन करताना अनेक समस्या सामोरे जावे लागत आहे कधी वन विभाग तर कधी सार्वजनिक बांधकाम विभाग याबाबत खोडा आणत असल्याने पाणी प्रश्न कसा निकालात काढायचा असा प्रश्न गावच्या पुढार्‍यांच्या समोर आहे. पाण्याबाबत अनेक समस्या असल्याने नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.

ऐतिहासिक विहिरींवर लक्ष देण्याची गरज

मादळे गावाच्या उत्तरेला जंगलात छत्रपती राजाराम महाराज कालीन विहिरी वर्षांपूर्वी उजेडात आली आहे. त्या विहिरींची साफसफाई करून डागडुजी केल्यास चांगला जलस्त्रोत उपलब्ध होऊ शकतो. यामुळे पाणी उपलब्ध करून समस्या कमी करता येईल. अशी काही नागरिकांनी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा :

Back to top button