Hatkangala Lok Sabha Election : ‘हातकणंगले’त उमेदवार निष्ठावंत हवा, उपरा नकोच; शाहूवाडी, पन्हाळ्यातील शिवसैनिकांचे एकमत

Hatkangala Lok Sabha Election : ‘हातकणंगले’त उमेदवार निष्ठावंत हवा, उपरा नकोच; शाहूवाडी, पन्हाळ्यातील शिवसैनिकांचे एकमत
Published on
Updated on

सरूड : पुढारी वृत्तसेवा :  हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनाच शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमधे हातकणंगलेवर नैसर्गिक हक्क सांगणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेत उमेदवारीबाबत अद्यापही भिजत घोंगडे कायम राहिले आहे. माजी खा. राजू शेट्टी यांनी 'मआवि'मध्ये येण्यास नकार दिल्याने आघाडीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमधला असंतोष वाढीस लागला आहे. यातून धैर्यशील माने यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे गटाकडे अनेक सक्षम पर्याय उपलब्ध असताना उपऱ्या उमेदवाराचा अट्टाहास कशाला ? असा सवाल शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील ठाकरेंच्या शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे. Hatkangala Lok Sabha Election

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमताने ठरवले तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा निष्ठावंत उमेदवार 'मशाल' चिन्हावर संसदेत प्रवेश करू शकतो, असा आत्मविश्वास शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शाहूवाडी येथील बैठकीत व्यक्त केला. Hatkangala Lok Sabha Election

दरम्यान, हातकणंगले मतदारसंघात उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती याशिवाय तळागाळात पोहचलेले पक्षाचे केडर याचा विचार करता पक्षाच्या बाहेरील काही इच्छूक उमेदवार ठाकरे गटाच्या उमेदवारीसाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. अशावेळी निष्ठवंत शिवसैनिकांचा तिळपापड होणे स्वाभाविक आहे. आजवर निवडणुकीच्या निमित्ताने पक्षात आलेल्या उमेदवारांनी ऐनवेळी पक्षाला सोडचिट्ठी देत केलेल्या गद्दारीची सल शिवसैनिकांना अस्वस्थ करतेय. निवेदिता माने, राजू शेट्टी, विद्यमान खा. धैर्यशील माने यांनी शिवसेनेशी सलगी करून ऐनवेळी फसविल्याचा राग सहजासहजी विसरण्यासारखा नाही. मग आताच्या निवडणुकीत पुन्हा हा वाईट अनुभव आम्हाला नको आहे. याचा विचार पक्षाच्या वरिष्ठांनी करावा, अशी अपेक्षा या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केली आहे.

दरम्यान, वरीष्ठ पदाधिकाऱ्यांना बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची इत्यंभूत माहिती फोनवरून देण्यात आली. शिवाय दोन्ही तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. मातोश्रीवर झालेल्या बैठकीतही हातकणंगलेत निष्ठावंत उमेदवाराला उमेदवारी देण्याबाबतचा विचार पक्का झाल्याची माहिती वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी फोनवरून दिल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी 'दै. पुढारी' शी बोलताना स्पष्ट केले.

बैठकीला कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी, शाहूवाडी तालुकाप्रमुख दत्तात्रय पवार, पन्हाळा तालुकाप्रमुख बाबासो पाटील, जिल्हा महिला उपसंघटिका अलका भालेकर, तालुका संघटिका पूनम भोसले, विभागप्रमुख संजय निकम, बांधकाम कामगार सेनेचे दिनकर लोहार, वरेवाडीचे सरपंच आनंदा भोसले, सचिन मुडशिंगकर, योगेश कुलकर्णी, विजय लाटकर, बाबासो पाटील-कडवेकर आदी शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news