Kolhapur News: बिबट्याच्या शोधासाठी ड्रोनची मदत | पुढारी

Kolhapur News: बिबट्याच्या शोधासाठी ड्रोनची मदत

कासारवाडी : पुढारी वृत्तसेवा; सादळे मादळे (ता. करवीर) येथील जंगल परिसरात निदर्शनास आलेल्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाने ड्रोनची मदत घेत व विभागाने शोध मोहीम सुरू केली आहे. (Kolhapur News)

शनिवारी सादळे मादळे येथील रस्त्यावर निदर्शनास आलेला बिबट्या रविवारी सादळे येथील सिद्धोबा टेकडीजवळ वावरताना शेतकर्‍यांना निदर्शनास आलेला बिबट्याचा शोध वन विभागाकडून सुरू आहे. यासाठी बुधवारी सायंकाळी ड्रोनच्या मदतीने सादळे मादळे कासारवाडी मनपाडळे परिसरात रात्री शोध घेतला. मात्र याला चकवा देत बिबट्या ड्रोनच्या कक्षेत आला नाही. (Kolhapur News)

गुरुवारी सकाळी विविध भागात वन विभागाची मोहीम सुरू होती. पण बिबट्या अद्याप वन विभागाच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आला नसल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. (Kolhapur News)

हे ही वाचा:

Back to top button