Kolhapur Pregnancy Diagnosis : बेकायदा गर्भलिंग निदान, गर्भपातप्रकरणी डॉक्टरला अटक | पुढारी

Kolhapur Pregnancy Diagnosis : बेकायदा गर्भलिंग निदान, गर्भपातप्रकरणी डॉक्टरला अटक

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा; क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणातील फरार संशयित डॉ. विजय गोपाळ नारकर (वय 63, रा. साखरपा, ता. देवरूख, जि. रत्नागिरी) यास करवीर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. याप्रकरणी अटक झालेल्या संशयिताची संख्या नऊ झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. (Kolhapur Pregnancy Diagnosis)

करवीर पोलिसांनी संशयिताच्या दवाखान्यातून गर्भपाताच्या औषधाचा साठा हस्तगत केला आहे. न्यायालयाने त्यास सोमवारी ( दि. 12 पोलिस कोठडी दिली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार आरोग्य व करवीर पोलिसांनी जानेवारी महिन्यात क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे छापा टाकून कारवाई केली होती. त्यात अवैध गर्भलिंग निदान व गर्भपाताचा भांडाफोड झाला होता. कारवाईनंतर निष्पन्न झालेल्या आठ संशयितांना अटक झाली होती. डॉ. नारकर यांचे नाव निष्पन्न झाल्याने त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. (Kolhapur Pregnancy Diagnosis)

हेही वाचा:

Back to top button