Farmer News : ऊस उत्पादकांना मिळणार 600 कोटी जादा | पुढारी

Farmer News : ऊस उत्पादकांना मिळणार 600 कोटी जादा

डी. बी. चव्हाण

कोल्हापूर : केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीत प्रतिक्विंटल 250 रुपये वाढ केली आहे. पुढील हंगामात कोल्हापूर विभागातील ऊस उत्पादकांना सुमारे 600 कोटी रुपये जादा मिळू शकतात. वाढीव दराने एफआरपी द्यावी लागणार असल्याने पैसे कोठून उपलब्ध करायचे, असा प्रश्न साखर कारखानदारांसमोर आहे. (Farmer News)

केंद्र सरकारने दोन वर्षांत तिसर्‍यांदा एफआरपीमध्ये वाढ केली आहे. या दरवाढीमुळे शेतकर्‍यांना त्याचा फायदा होणार आहे, पण तोडणी आणि वाहतूक दरातही वाढ केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना वाढीव एफआरपीचा किती फायदा होणार हा प्रश्न आहे.

कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांची एफआरपी ही 11.30 ते 12.30 टक्के प्रमाणे होते. वाढीव एफआरपीचा विचार केल्यास कोल्हापूर विभागातील शेतकर्‍यांना 3 हजार 815 ते 4 हजार 147 रुपये इतका दर मिळणार आहे. यातून ऊस तोडणी व वाहतूक यांचा खर्च 900 वजा झाल्यास शेतकर्‍यांना 3,215 ते 3,400 रुपये इतका दर मिळू शकतो. यामुळे वाढीव एफआरपीचा विचार केला तर उसाला प्रतिटन रु. 3200 ते 3400 रुपये दर मिळू शकणार आहे. गतवर्षी 10.25 टक्के एफआरपीसाठी 3,150 रुपये इतका दर होता. (Farmer News)

त्यापुढे प्रत्येक टक्क्यासाठी 301 रुपये दर मिळत होता. त्यामुळे 3,400 रुपये इतका दर मिळत असे. यातून 700 रुपये तोडणी व ओढणी वजा केल्यास हातात 2600 ते 2700 रुपये प्रतिटन मिळत होता. पुढील हंगामात 2 कोटी 50 लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. प्रतिटन सरासरी 3,400 दर निश्चित करून त्याचा हिशेब केल्यास 7820 रुपये शेतकर्‍यांना मिळू शकतात. गतवर्षी ही रक्कम सुमारे 500 ते 600 कोटींने अधिक मिळणार आहे.

हेही वाचा :

Back to top button