मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आंदोलनातून प्रसिद्धी मिळत असल्याचे पाहून मनोज जरांगे यांनी आपल्या रस्ते आंदोलनात वयोवृद्धांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या आंदोलनात दुर्दैवाने कोणी दगावल्यास जरांगे यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. जरांगे यांचे आंदोलन मारुतीच्या शेपटासारखे आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. (Chhagan Bhujbal)
मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यासाठी केलेला कायदा जरांगे यांना मान्य नाही. ते पुन्हा आंदोलनाला लागले आहेत. त्यांना कायदा आणि नियमांबाबत काहीही कळत नाही. आता त्यांनी रस्ते बंद करण्याचे आणि सामूहिक उपोषण करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे उपोषणात कोणी दगावल्यास जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे भुजबळ म्हणाले.