Dr. Yogesh Jadhav Birthday : डॉ. योगेश जाधव यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव | पुढारी

Dr. Yogesh Jadhav Birthday : डॉ. योगेश जाधव यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’चे समूह संपादक व चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. दै. ‘पुढारी’ कार्यालयात येऊन शुभेच्छा देणार्‍यांमध्ये राजकीय, सामाजिक, विधी, वैद्यकीय, क्रीडा, साहित्यिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. दै. ‘पुढारी’च्या 85 वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर ‘पुढारी’ने ‘पुढारी न्यूज’ हे टी.व्ही. चॅनल सुरू केले असून, ‘मीडिया अंडर वन रूफ’ ही संकल्पना यशस्वीपणे राबविल्याबद्दल मान्यवरांनी मीडिया एडिटर म्हणून डॉ. योगेश जाधव यांचे कौतुक केले. त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेले ‘पुढारी न्यूज’ चॅनल जगभरातील 95 देशांमध्ये आवर्जून पाहिले जाते, याचा उल्लेख करत उपस्थितांनी आपल्या परदेशातील नातेवाईकांकडून ‘पुढारी न्यूज’ चॅनलबद्दल ऐकलेले अनुभव यावेळी शेअर केले. (Dr. Yogesh Jadhav Birthday)

‘पुढारी न्यूज’ चॅनलच्या उद्घाटनानंतर आलेल्या डॉ. योगेश जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘पुढारी न्यूज’ चॅनलविषयी समाधान व्यक्त करत त्यांनी चॅनलकडून असलेल्या अपेक्षाही यावेळी शेअर केल्या.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मालोजीराजे छत्रपती, आ. प्रकाश आवाडे, आ. जयश्री जाधव, आ. ऋतुराज पाटील, आ. प्रा. जयंत आसगावकर, माजी आमदार व राजाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक, माजी आमदार व कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके, माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, विश्वविजय खानविलकर, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहर अध्यक्ष आर. के. पोवार, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, प्रदेश चिटणीस महेश जाधव, ‘गोकुळ’च्या संचालिका व भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक, जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण देसाई, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख जयश्री देसाई, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव व मनीषा देसाई, बाजार समिती सभापती भारत पाटील-भुयेकर, सचिव जयंत पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हा शासकीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल लवेकर, जि.प. कर्मचारी सोसायटीचे अध्यक्ष रणजित पाटील, महानगरपालिका उपकार्यकारी अभियंता नारायण भोसले, अंबाबाई देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे, महालक्ष्मी धर्मशाळेचे अध्यक्ष राजू मेवेकरी, श्रीपूजक संघाचे केदार मुनीश्वर व ऐश्वर्या मुनीश्वर, डॉ. संजय एस. पाटील, सुरेश पाटील, भारत पाटील, अ‍ॅड. सुरेश कुर्‍हाडे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा पद्मा पाटील, सुशांत पाटील, वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, जिल्हा परिषद कर्मचारी संघाचे अध्यक्ष सचिन जाधव, प्रदीप सकटे, भाकपचे जिल्हा चिटणीस सतीशचंद्र कांबळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, तनिष्कचे प्रसाद कामत, जय कामत, कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या डॉ. रेश्मा पवार, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, ‘दालन’चे चेअरमन चेतन वसा, सेक्रेटरी संदीप मिरजकर, संचालक विश्वजित जाधव, आविष्कार इन्फ्राचे अविनाश जाधव, अभिषेक डोंगळे, चाटे समूहाचे प्रा. डॉ. भारत खराटे, ‘गोकुळ’चे जनसंपर्क अधिकारी संग्राम पाटील, ‘डी. वाय. पाटील’चे जनसंपर्क अधिकारी संदीप खानोलकर, बाबा जांभळे, कोल्हापूर सराफ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश राठोड, सेक्रेटरी प्रीतम ओसवाल, ईश्वर परमार, निवृत्त डीवायएसपी आर. आर. पाटील, अ‍ॅड. अमेय बकरे, जयेंद्र पब्लिसिटीचे पी. एस. कुलकर्णी, ‘आसमा’चे अध्यक्ष आणि आयमॅक्स अ‍ॅड एजन्सीचे सुनील बासरानी, क्लायमॅक्स अ‍ॅडव्हर्टायझिंगचे उदय जोशी, लुकतुके पब्लिसिटीचे सुहास लुकतुके, संपर्क अ‍ॅडव्हर्टायझिंगचे सुधीर शिरोडकर, विश्व अ‍ॅडव्हर्टायझिंगचे अविनाश पेंडुरकर, अभय पब्लिसिटीचे अभय मिराशी, विमल पब्लिसिटीचे जगदीश शहा, इंटरट्रेड पब्लिसिटीचे सलीम देवळे, अस्लम देवळे, प्रियदर्शिनी पब्लिसिटीचे किरण व्हनगुत्ते, अ‍ॅड किंगचे अतुल शिंदे, इम्प्रेशन पब्लिसिटीचे सुनील बनगे, वेदांत पब्लिसिटीचे विजय पोवार, स्नेह अ‍ॅडव्हर्टायझिंगचे प्रशांत बुचडे, संज्योती ग्राफिक्सचे संजय रणदिवे, कला कल्पनाचे संजीव चिपळुणकर, ग्रॅव्हिटीचे विवेक मंद्रुपकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, मानद सचिव प्रशांत शिंदे, अजित कोठारी, माजी अध्यक्ष आनंद माने, संचालक राहुल नष्टे, संपत पाटील, संभाजीराव पोवार, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीने प्रसन्न तेरदाळकर, प्रदीप व्हरांबळे, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे, कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशनचे अध्यक्ष किरण व्हनगुत्ते, महालक्ष्मी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष केदार पाटील आदी मान्यवरांनी डॉ. योगेश जाधव यांचे अभीष्टचिंतन करून त्यांना दीर्घ आयुरारोग्य चिंतिले. (Dr. Yogesh Jadhav Birthday)

संबंधित बातम्या

पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर आदींनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. दसरा चौक येथील कोल्हापुरी थाळी उपक्रमात डॉ. जाधव यांच्या हस्ते भोजन वाटप केले.

हेही वाचा :

Back to top button