Amalner Marathi Sahitya Sammelan : भटक्या विमुक्त समाजाला मूळ प्रवाहात आणणे गरजेचे: गिरीश प्रभुणे

Amalner Marathi Sahitya Sammelan : भटक्या विमुक्त समाजाला मूळ प्रवाहात आणणे गरजेचे: गिरीश प्रभुणे
Published on
Updated on

अमळनेर: पुढारी वृत्तसेवा : आधुनिक जगामध्ये आधुनिकची कास धरताना चंद्रावर जात असताना समाजातील भटक्या विमुक्त समाजालाही समजून घेत त्यांच्या प्रगतीसाठी काम करणे, हे आजच्या काळाची गरज आहे. नंदीबैल पारधी मरीआई या समाजाला मूळ प्रवाहात आणण्याचे प्रयत्न करताना समाजाने साथ देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. Amalner Marathi Sahitya Sammelan

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठाच्या पहिल्या सत्रात रवींद्र गोळे (मुंबई), सारंग दर्शने (मुंबई) यांनी प्रभुणे यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश काटे यांनी केले.
ते म्हणाले की, साहित्य परिषदेत मार्क्सवादावर खडाजंगी चर्चा होत असे. त्यावर माणूस या साप्ताहिकात लेखन करत असे. Amalner Marathi Sahitya Sammelan

माजगावकरांनी नुसते असे लेखन करण्यापेक्षा कृती करून लेखन करण्याचा सल्ला दिला आणि तो तंतोतंत अंमलात आणला. त्यासाठी मी काही दिवस खेडेगावात राहण्यास गेलो. स्टेशनच्या बाहेर गर्दी दिसल्यावर त्यांच्याशी बोलण्यास गेलो व बोलताना त्यांनी सांगितले की, गावात पाणी टंचाई असल्याने शेती झाली नाही. पिण्यास पाणी नाही, म्हणून गाव सोडून जात आहे.

निमगाव म्हाळगी येथे राहत असताना गावात नंदी बैलवाला, मरीआई वाले, पारधी भिक्षा मागण्यास येत. शिक्षण, संस्कार या सारख्या विविध बाबींचा गंधही नसलेल्या या समाजाबद्दल जवळून माहिती घेतली आणि ठरवले की, या समाजाच्या प्रगतीसाठी आपण काम करायला हवे. ही स्थिती तेव्हाची असली तरी आजही ग्रामीण भागातील स्थिती फारशी वेगळी नाही. ग्रामीण भागात आजही पाण्याची स्थिती गंभीर आहे. तेव्हा हा समाज गावाच्या प्रमुखाची कामे विनामोबदला करत त्या बदल्यात प्रमुख त्यांना धान्य देत असे. काळ बदलला. प्रमुखाकडून मोफत धान्य देणे बंद झाले आणि बारा बलुतेदार त्यांच्या कामासाठी व मोबदल्यासाठी वणवण फिरू लागले. कामधंदा नसल्याने चोऱ्या करू लागले. पोलीस त्यांना पकडू लागले. कोठे काही झाले की पहिला संशय यांच्यावरच. पोलीस येत पुरूषांना पकडून घेवून जात. त्यांच्या महिला मग कोर्टकचेऱ्यातच आयुष्य घालवत. त्यातुन तो सुटला तर दुसरे पोलीस हजर. अशा रितीने या समाजांचे जीवन हालाखीचे झाले आहे. ही सामाजिक असंतोषाची नांदी असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news