कोल्हापूर : राज्य मागासवर्ग आयोगाकडून आज मराठा, खुला प्रवर्ग सर्वेक्षण आढावा | पुढारी

कोल्हापूर : राज्य मागासवर्ग आयोगाकडून आज मराठा, खुला प्रवर्ग सर्वेक्षण आढावा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य मागासवर्ग आयोगाकडून सोमवारी कोल्हापुरात सुरू असलेल्या मराठा व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचा आढावा घेतला जाणार आहे. याकरिता आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिंद्रनाथ तांबे जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यात मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. याबरोबरच आयोगाने मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांकडे असलेल्या जमीनधारणेची माहिती मागवली आहे. याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आयोगाकडून आढावा घेण्याचेही काम सुरू आहे.

सोमवारी आयोगाचे सदस्य प्रा. तांबे जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी तीन वाजता जमीनधारणेविषयी बैठक घेणार आहेत. 1960 ते 2020 या कालावधीतील जमीनधारणेविषयी जिल्ह्यातील स्थितीची ते माहिती घेणार आहेत. यानंतर ते कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या सर्वेक्षणाचा महापालिका आयुक्तांकडून आढावा घेणार आहेत.

Back to top button