कोल्हापूर : अजित पवारांची बैठक; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तरुणाचा जीवन संपविण्याचा प्रयत्न | पुढारी

कोल्हापूर : अजित पवारांची बैठक; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तरुणाचा जीवन संपविण्याचा प्रयत्न

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गावगुंडांनी घर पाडले, असा आरोप करत एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज (दि.२९) आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी कुटुंबातील एकाने हातात तेलाचा डब्बा घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ या सर्वांना ताब्यात घेतले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू असतानाच हा प्रकार झाल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली.

सागर पुजारी (रा. कसबा सांगाव, ता. कागल) असे या व्यक्तीचे नाव आहे. तो जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हातात तेलाचा डब्बा घेऊन कुटुंबासह आला होता. त्याच्या हातात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोही होता.
कसबा सांगाव येथे गावगुंडांनी घर पाडले, असा आरोप करत तहसीलदार आणि मंडल अधिकाऱ्यांनी सुद्धा आमच्यावर अन्याय केल्याचा त्यांने गंभीर आरोप केला.

हेही वाचा 

Back to top button