कोल्हापूर : तावरेवाडीत गॅसच्या स्फोटात मायलेकी जखमी | पुढारी

कोल्हापूर : तावरेवाडीत गॅसच्या स्फोटात मायलेकी जखमी

चंदगड; पुढारी वृत्तसेवा : तावरेवाडीत ( ता. चंदगड) घरगुती गॅसच्या स्फोटात घरातील साहित्याचे नुकसान झाले. यामध्ये मायलेकी जखमी झाल्या. दैव बलवत्तर म्हणूनच जिवीतहानी टळली.

तावरेवाडी येथील विकास बाजीराव रेडेकर यांच्या राहत्या घरातील घरगुती इंडेन कंपनीच्या गॅस सिलेंडर टाकीचा रात्री तीन वाजता अचानक स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती, की शेडचे पत्रे उडून गेले. तसेच घराचे दरवाजे मोडले आणि काचेची तावदाने फुटली. यामध्ये प्रापंचिक साहित्यासह मोठे नुकसान झाले आहे. गाढ झोपी गे ले.  लेल्या मनीषा बाजीराव रेडेकर व तिची आई गॅसच्या झळानी जखमी झाल्या. या घटनेची नोंद झाली नाही. तालुक्यात एका महिन्यातील ही दुसरी घटना आहे.

Back to top button