

आजरा; पुढारी वृत्तसेवा : आवंडी (ता.आजरा) येथील क्रमांक तीन मधील धनगरवाड्यावर बिबट्याच्या हल्यात एक शेळी ठार झाली. या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यापूर्वी देखील बिबट्याने या परिसरात बकरी, बैल, म्हैस अशा पाळीव प्राण्यांवर हल्ला केला होता.
आवंडी धनगरवाडा क्रमांक तीन येथील पदू भागू वरक हे मंगळवार (दि १२) दुपारी बकरी चारण्यासाठी वाड्याशेजारील जंगलात गेले होते. संध्याकाळी घरी येत आसताना अचानक बिबट्याने शेळीवर हल्ला केला. यावेळी घाबरलेले वरक बाकिच्या शेळ्यांना घेऊन घरी आले. तातडीने वनविभागाला कळवल्यानंतर वन कर्मचारी पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दोन महिन्यांपूर्वी बिबट्याने बैलावर हल्ला केल्याची घटना घडली होती. बिबट्याच्या सततच्या हल्ल्यामूळे वाड्यावरील ग्रामस्थांमध्ये भीतीच्या छायेत आहेत.
हेही वाचा :