

कबनूर; पुढारी वृत्तसेवा : कबनूर ओढ्यापासून पंचगंगा साखर कारखान्याकडे गेलेल्या बायपास रोडवरील जयकुमार कोले यांचा १२ एकर, आप्पासो निंबाळकर यांचा ३ एकर व सुभाष कोले यांचा अर्धा एकर अशा एकूण साडेपंधरा एकरातील ऊसाला बुधवारी (दि. १३) सायंकाळी ६ च्या सुमारास आग लागली. आगीत साडेपंधरा एकरातील संपूर्ण ऊस जळून खाक झाला.
आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पंचगंगा साखर कारखान्याच्या अग्निशामकनेही आग विझवण्याचा प्रयत्न
केला, पण साडेपंधरा एकर ऊस जळून खाक झाला. यामुळे सुमारे ३५ ते ३६ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.